कार्तिकच्या खेळीने तामिळनाडूचा विजय

कर्णधार दिनेश कार्तिकने ६ चौकार आणि एका षटकारासह ९१ धावांची खेळी केली

dinesh karthik
दिनेश कार्तिक

 

सांघिक प्रदर्शनाच्या जोरावर तामिळनाडूने देवधर चषक क्रिकेट स्पर्धेत भारत अ संघावर ७३ धावांनी मात केली. तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना ३०३ धावांची मजल मारली.

कर्णधार दिनेश कार्तिकने ६ चौकार आणि एका षटकारासह ९१ धावांची खेळी केली. नारायण जगदीशनने ७१ धावा केल्या. भारत अ संघातर्फे शार्दूल ठाकूरने ३ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारत अ संघाचा डाव २३० धावांतच आटोपला. मनदीप सिंगचे शतक व्यर्थ ठरले. त्याने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ९७ धावांची खेळी केली. मनदीपला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही. राहिल शाह आणि रविश्रीनिवासन साई किशोर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. या विजयासहतामिळनाडू संघाने २ गुणांची कमाई केली.

संक्षिप्त धावफलक

तामिळनाडू : ५० षटकांत ६ बाद ३०३ (दिनेश कार्तिक ९३, नारायण जगदीशन ७१; शार्दूल ठाकूर ३/४९) विजयी विरुद्ध भारत अ : ४४.४ षटकांत सर्वबाद २३० (मनदीप सिंग ९७; राहील शाह ३/३७).

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Deodhar trophy 2017 tamilnadu win

ताज्या बातम्या