scorecardresearch

Diamond League : नीरज चोप्राला विजेतेपदाची हुलकावणी, अवघ्या काही सेंटीमीटरने हुकलं जेतेपद

Neeraj Chopra Diamond League Final : नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धा सलग दोन वेळा जिंकण्याची संधी गमावली आहे.

Neeraj CHopra
डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. (PC : Neeraj Chopra Instagram)

Diamond League 2023 Final : भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखला जाणारा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत दुसरं स्थान पटकावलं आहे. अमेरिकेतल्या यूजीन शहरात खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरजने ८३.८० मीटर लांब भाला फेकला. तर चेक प्रजासत्ताकच्या जेकब वाडलेचने ८४.२३ मीटर दूर भाला फेकून पहिलं स्थान पटकावलं. अवघ्या ०.४४ मीटरच्या फरकाने जेकबने विजेतेपद पटकावलं, तर नीरजला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरज त्याच्या नेहमीच्या लयीत दिसला नाही. तसेच त्याचे दोन प्रयत्न फाऊल झाले. तर उर्वरित तीन प्रयत्नांमध्ये नीरज त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. तर जेकब वाडलेचने पहिल्या थ्रोपासूनच आघाडी कायम ठेवली. नीरजने ही स्पर्धा जिंकली असती तर डायमंड लीग स्पर्धा सलग दोन वेळा जिंकणारा तो केवळ तिसरा खेळाडू ठरला असता. परंतु, नीरजने इतिहास रचण्याची संधी गमावली आहे.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Ajit Pawar on Sharad Pawar Praful Patel Photo
पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

चेक प्रजासत्ताकच्या विटेजस्लाव वेस्ली याने २०१२ आणि २०१३ साली सलग दोन वेळा डायमंड लीग स्पर्धा जिंकली होती तर. जेकब वाडलेच याने २०१६ आणि २०१७ साली सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकली होती. नीरजने गेल्या वर्षी झुरिच येथे खेळवण्यात आलेल्या डायमंड लीगमधील भालाफेक स्पर्धेत विजेतेपद पटकावलं होतं.

डायमंड लीग २०२३ च्या अंतिम फेरीतली नीरज चोप्राची कामगिरी

पहिला प्रयत्न : फाऊल
दुसरा प्रयत्न : ८३.८० मीटर
तिसरा प्रयत्न : ८१.३७
चौथा प्रयत्न : फाऊल
पाचवा प्रयत्न : ८०.७४ मीटर
सहावा प्रयत्न : ८०.९० मीटर

हे ही वाचा >> Asian Games : भारताच्या महिला आणि पुरुष संघांमध्ये मोठे बदल, दोन दुखापतग्रस्त खेळाडू संघाबाहेर

डायमंड लीगच्या अंतिम फेरीतल्या टॉप ६ खेळाडूंची कामगिरी

जेकब वाडलेच (चेक प्रजासत्ताक) : ८४.२४ मीटर
नीरज चोप्रा (भारत) : ८३.८० मीटर
ओलिव्हर हेलँडर (फिनलँड) : ८३.७४ मीटर
अँड्रियन मर्डारे (मोल्डोव्हो) : ८१.७९ मीटर
कर्टिस थॉम्पसन (अमेरिका) : ७७.०१ मीटर
अँडरसन पीटर्स (ग्रेनडा) : ७४.७१ मीटर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2023 at 11:24 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×