T20 WC : ‘या’ खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर का ठेवले?; माजी क्रिकेटपटूने केली चौकशीची मागणी

टी -२० विश्वचषकात पाकिस्तानंतर न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला.

T20 WC
न्यूझीलंडकडून भारताचा आठ विकेट्सनी पराभव झाला (photo ap)

टी -२० विश्वचषकात पाकिस्तानंतर न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला. त्यामुळे भारतीय संघावर प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत. न्यूझीलंडकडून भारताचा आठ विकेट्सनी पराभव झाल्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी निवडकर्ते दिलीप वेंगसरकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 

वेंगसरकर यांनी सांगितल की, न्यूझीलंडविरुद्धच्या टी -२० विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय संघाला ऐवढ्या खराब फॉर्ममध्ये झुंजताना कधी पाहिले नाही. तसेत आर अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून वारंवार वगळण्याच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली.

वेंगसरकर म्हणाले, “संघ अजिबात फॉर्ममध्ये नव्हता आणि खेळाडू थकलेले दिसत होते. मी बऱ्याच दिवसांपासून खेळाडूंचे असे हावभाव पाहिलेले नाही. ही कामगिरी खूपच खराब होती. मग ती फलंदाजी असो किंवा गोलंदाजी. या फॉरमॅटमध्ये पहिल्या चेंडूपासून चांगली कामगिरी करावी लागते.”

पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा या दोन फिरकी गोलंदाजाना संघात घेतले आणि अश्विनला बाहेर ठेवले. वेंगसरकर म्हणाले, “अश्विनला पुन्हा पुन्हा बाहेर का ठेवले जात आहे. हा तपासाचा विषय आहे. तो प्रत्येक फॉरमॅटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे आणि त्याने ६०० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. तो सर्वात वरिष्ठ फिरकीपटू आहे आणि त्यालाच संघात घेतले जात नाहीये.” 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dilip vengsarkar surprised with ravi ashwin constant exclusion from the indian team srk

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या