“अन् तीनचे पाच झालो,” दिनेश कार्तिकच्या पत्नीने दिली ‘गुड न्यूज’; शेअर केले फोटो

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज दिनेश कार्तिकच्या पत्नीने दोन गोंडस मुलांना जन्म दिला आहे

Dinesh Karthik, Dipika Pallikal Karthik, दिनेश कार्तिक
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज दिनेश कार्तिकच्या पत्नीने दोन गोंडस मुलांना जन्म दिला आहे

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज दिनेश कार्तिकच्या पत्नीने दोन गोंडस मुलांना जन्म दिला आहे. दिनेश कार्तिकने सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्नी दीपिकाने दोन मुलांना जन्म दिल्याची माहिती दिली. दिनेश कार्तिकने यावेळी पत्नी आणि मुलांसोबतचा फोटोही शेअर केला आहे.

हे फोटो शेअर करताना दिनेश कार्तिकने कॅप्शन दिली आहे की, “आणि आम्ही आाता तिघांचे पाच झालो आहोत. दोन सुंदर मुलं आमच्या घरी झाली आहेत. यापेक्षा जास्त आनंदी आम्ही असू शकत नाही”. कार्तिकने या पोस्टमध्ये मुलांची नावंदेखील सांगितली आहे. कबीर आणि झियान अशी त्यांची नावं आहेत.

यानंतर सोशल मीडियावर कार्तिक आणि दिपिका यांचं अभिनंदन केलं जात आहे. कार्तिकची पत्नी दिपिका स्क्वॅश खेळाडू आहे. वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारी दिपिका पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. याशिवाय तिने अनेक एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकांची कमाई केली आहे.

दीपिकानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गुड न्यूज शेअर केली आहे.

आयपीएल २०२१ मध्ये कार्तिक कोलकाताकडून खेळत होता. गुणतालिकेत कोकलाता संघ चौथ्या क्रमांकावर होता. यानंतर कोलकाताने चार गडी राखत बंगळुरुचा पराभव केला होता. यानंतर क्वालिफायर २ मध्ये कोलकाता आणि दिल्ली संघ आमने-सामने होता. या सामन्यात तीन गडी राखत कोलकाताने विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. पण चेन्नईने २७ धावांनी पराभव करत कोलकाता पराभव करत पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकली.

कोलकाता संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असताना कार्तिक मात्र चांगली खेळी करु शकला नाही. १७ सामन्यांमध्ये त्याने फक्त २२३ धावा केल्या. तो अर्धशतकही करु शकला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dinesh karthik dipika pallikal karthik blessed with two beautiful baby boys sgy