आयपीएल २०२१च्या ४१ सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला ३ गड्यांनी मात दिली आहे. शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात दिल्लीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांनी २० षटकात ९ बाद १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने आपले सात फलंदाज गमावले पण नितीश राणाच्या नाबाद ३६ आणि सुनील नरिनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर त्यांनी हा विजय आपल्या नावावर केला. सामन्यादरम्यान, अंगावर शहारे येतील असा प्रकार घडला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फलंदाजी करताना ऋषभ पंतने चेंडू स्टम्पला लागू नये म्हणून बॅटने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी मागे उभा असलेला दिनेश कार्तिक पुढे आला आणि ऋषभ पंतची बॅट त्याच्या हेल्मेटच्या जवळून गेली. त्याने ऋषभच्या वेगवान फटक्यापासून स्वत:ला वाचवले. ऋषभ पंतची बॅट त्याच्या हेल्मेटला लागली नाही आणि तो थोडक्यात बचावला. या सर्व प्रकारानंतर ऋषभ पंतने दिनेश कार्तिकची माफी मागितली. पण कार्तिकनेही रागात ऋषभ पंतकडे पाहिले. हे दृश्य पाहून गोलंदाज वरुण चक्रवर्तीलाही धक्का बसला. 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि आयपीएलचे चाहते त्यावर कॅप्शन लिहित आहेत. या घटनेबद्दल कोणीतरी लिहिले की ऋषभ पंतने दिनेश कार्तिकचे डोके जवळजवळ फोडले होते.

IPL 2021 : पराक्रमी पंत..! सामना गमावला पण ‘मोठा’ विक्रम नावावर केला

दिल्ली कॅपिटल्स आणि कर्णधार ऋषभ पंतने चालू हंगामात चांगली कामगिरी केली आहे. पंतचा संघ गुणतालिकेत १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यापासून दिल्ली फक्त एका विजयापासून दुर आहे. पंतने आज (मंगळवार) केकेआरविरुद्ध ३९ धावा केल्या. यासह तो दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने माजी अनुभवी फलंदाज वीरेंद्र सेहवागला मागे सोडले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dinesh karthik survived briefly rishabh pant swung the bat fast srk
First published on: 28-09-2021 at 21:23 IST