प्रतिभावंत बुद्धिबळपटू महिला फिडे मास्टर दिव्या देशमुखने मंगोलिया येथील अलानबटर येथे सुरू असलेल्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत १२ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.
भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या दिव्याने बुद्धिबळाच्या ब्लिट्झ प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. स्टॅंडर्ड प्रकारात तिने सुवर्णपदक पटकावून मंगोलियात भारताचा झेंडा फडकावला. रॅपिड प्रकारात तिने रौप्यपदक मिळवले आहे. दिव्याने गुरुवारी सकाळी झालेल्या स्टॅंडर्ड प्रकारातील अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी मृदूल डेहनकरला आठ गुणांनी पराभूत करून चॅम्पियनचा किताब आपल्या नावे केला. दिव्याने मागील चार-पाच वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे.
भारतात सर्वात कमी वयात ‘महिला फिडे मास्टर’हा प्रतिष्ठेचा किताब पटकावणाऱ्या दिव्याने १२ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रतिस्पर्धी मृदूलला पराभूत करून विजय प्राप्त केला.