महाराष्ट्रातील दिव्या देशमुख हिने बुडापेस्टमध्ये बुद्धीबळ स्पर्धेत भारताची नवी महिला ग्रँडमास्टर बनण्याचा मान मिळवला आहे. “दुसरा आंतरराष्ट्रीय मास्टर निकष आणि शेवटची महिला ग्रँडमास्टर पूर्ण केली. आगामी स्पर्धेत चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.”, असं ट्वीट १५ वर्षीय दिव्याने केलं आहे. करोनाचं संकट ओढावल्यानंतर बुडापेस्टमधील दिव्या देशमुख हिचा पहिला बोर्ड इव्हेंट होता.

दिव्याने नऊ फेऱ्यांमध्ये पाच गुण मिळवले आणि तिचे गुण २४५२ इतके झाले आहेत. आता आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्यासाठी तिला एक पाऊल दूर आहे. तिने दुसरा मास्टर निकष गाठल्यास ती आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर होईल.

“भारताच्या नवीन महिला ग्रँड मास्टर दिव्या देशमुख यांचे अभिनंदन. दिव्या देशमुख बुडापेस्ट हंगेरीमधील ग्रँडमास्टरमध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म मिळवल्यानंतर देशातील नवीन महिला ग्रँडमास्टर बनली आहे.” ऑल इंडिया चेस फेडरेशननं हे ट्वीट केलं आहे.

या स्पर्धेत तीने तीन विजयांव्यतिरिक्त, चार ड्रा खेळले आहेत. तर दोन सामने गमावले आहे. दिव्याने वेलम्मल आंतरराष्ट्रीय महिला राउंड रॉबिन स्पर्धा आणि एरोफ्लोट ओपन २०१९ मध्ये चांगली कामगिरी केली होती.