विंबल्डनचा २०११ सालचा विजेता टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने यावेळीच्या विंबल्डनमध्येही विजयी मालिका सुरू ठेवली आहे. फ्रान्सच्या जेरेमी चार्डीवर नोवाकने सहज मात करत विंबल्डनची चौथी फेरी गाठली आहे. मुख्यम्हणजे आतापर्यंतच्या विंबल्डन मालिकेमधील हा जोकोव्हिचचा पन्नासावा विजय होता. जोकोव्हिचने चार्डीवर ६-३,६-२,६-२ अशी मात केली. आता उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी जोकोव्हिचसमोर क्रमवारीत १३व्या मानांकित टॉमी हासचे आव्हान असेल. जेरेमी चार्डीवर मिळविलेल्या सहज विजयानंतर यावेळेचेही विंब्लडन विजेचेपद नोवाक जोकोव्हिच पटकावेल अशी आशा टेनिस रसिकांकडून व्यक्त केली जात आहे.    

Story img Loader