पॅरिस : सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने पायाच्या दुखापतीने त्रस्त झालेल्या स्पेनच्या कार्लोस अल्कराझचा ६-३, ५-७, ६-१, ६-१ असा पराभव करून सातव्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. वयाच्या ३६व्या वर्षी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा जोकोव्हिच १९२५ पासून केवळ दुसराच टेनिसपटू ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोकोव्हिचने पहिल्या सेटपासून आपल्या खेळातील आक्रमकता दाखवली. पहिला सेट जोकोव्हिचने अगदी सहज जिंकला. पण, जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या अल्कराझने दुसऱ्या सेटमध्ये कमालीची लढाऊ वृत्ती दाखवत अगदी अखेरच्या क्षणी दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या सेटपासून अल्कारझला पायात वेदना जाणवू लागल्या. त्याच्या हालचाली आणि फटक्यातील वेग मंदावला होता. याचा फायदा घेत जोकोव्हिचने  तिसरा आणि चौथा सेट अगदी सहज जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Djokovic beats cramping alcaraz reaches seventh french open final zws
First published on: 10-06-2023 at 06:32 IST