Indian Womens Cricket Team Back flip catch Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ह पाहू शकता की, भारतीय महिला संघातील खेळाडू बॅकफ्लिप मारून भन्नाट आणि डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, असा झेल घेताना दिसून येत आहे. काही युझर्स हरमनप्रीन कौरचं नाव घेऊन हा व्हिडीओ शेअर करत आहेत. तर काहींनी क्रिकेट इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात बेस्ट कॅच असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर केला आहे. पण या व्हिडीओमागचं नेमकं सत्त काय? हा व्हिडीओ खरा आहे की खोटा? जाणून घ्या.

सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेला हा व्हिडीओ कुठल्याही सामन्यातील नसून एआय जनरेटेड आहे. क्रिकेटमध्ये असा झेल घेणं जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे AI चा वापर करून हा व्हिडीओ केवळ मनोरंजनाच्या हेतूने तयार करण्यात आला आहे. हा व्हिडीओ खऱ्याखुऱ्या सामन्यातील आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेली खेळाडू देखील भारतीय संघातील खेळाडू आहे. पण झेल टिपतानाचा व्हिडीओ हा AIचा वापर करून बनवण्यात आला आहे.

AI च्या वाढत्या वापरामुळे व्हिडीओमध्ये कुठलेही बदल करणं सहजशक्य आहे. तसेच डीपफेक टेक्नॉलॉजीचा वापर करून, कुठल्याही सेलिब्रिटीच्या चेहऱ्याचा किंवा आवाजाचा वापर करून नकली व्हिडीओ तयार करता येतो. या झेलचा व्हिडीओ देखील अशाच टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यातील आहे, असं म्हटलं जातंय. हा व्हिडीओ अनेकांनी केवळ मनोरंजनासाठी शेअर केला आहे. पण क्रिकेटमध्ये बॅकफ्लिप मारून असा झेल घेणं मुळीच शक्य नाही. कारण, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असताना खेळाडूंवर खूप जास्त दबाव असतो. इतक्या दबावात सरळ झेल घेणं कठीण जातं. तर बॅकफ्लिप मारून झेल पकडण्याची रिस्क कोण आणि का घेईल. अनेकांनी या व्हिडीओच्या खाली हा AI व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे.