मेस्सीसाठी पॅरिसमध्ये तीन लाख चाहत्यांची गर्दी?; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये असा दावा केला गेला की मेस्सीचे शहरात स्वागत करण्यासाठी ३००,००० पेक्षा जास्त लोकांचा जमाव पॅरिसच्या रस्त्यावर जमा झाला होता.

3 Lakh Fans Waiting For Lionel Messi In Paris
व्हिडीओला २.८ लाखांहून अधिक लोकांनी बघितलं आहे (फोटो: Reuters & @BobGanst/Twitter)

गेल्या काही दिवसांतील क्रीडा जगतातील सर्वात मोठी बातमी म्हणजे फुटबॉलपटू मेस्सीचा एफसी बार्सिलोनाशी असलेला दीर्घ संबंध संपुष्टात आला आहे. त्यानंतर फुटबॉल आयकॉनने अधिकृतपणे पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) सोबत करार केला. याचं फ्रान्समधील खेळाच्या चाहत्यांनी तसेच मेस्सीने स्वागत केलं आहे. दरम्यान  एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये असा दावा केला गेला की मेस्सीचे शहरात स्वागत करण्यासाठी ३००,००० पेक्षा जास्त लोकांचा जमाव पॅरिसच्या रस्त्यावर जमा झाला होता. १० ऑगस्ट रोजी ट्विटरवर प्रकाशित झाल्यापासून या व्हिडीओला २.८  लाखांहून अधिक लोकांनी बघितलं आहे.

“३००,००० पेक्षा जास्त लोक पॅरिसच्या रस्त्यावर आहेत, म्हणूनच मेस्सी हा आतापर्यंतचा सर्वोत्तम खेळाडू आहे.” या कॅप्शनसह गर्दीचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला गेला.

तथापि, असे दिसून आले की जगभरात मेस्सीचा प्रचंड चाहता वर्ग असूनही तो व्हिडीओ बनावट आहे. फ्रेंच फुटबॉल विश्वातील घडामोडींच्या जोरावर अनेक चाहते व्हिडीओला बळी पडले असताना, काही वापरकर्त्यांनी त्या भागाचे लोकेशन शोधले आणि समजलं की क्लिप खर तर पॅरिसमध्ये चित्रित केलेली नाही.

कसं समजलं?

व्हिडीओच्या सुरुवातीला “मक्का” असं वाचलेल्या चिन्हाच्या उपस्थितीने याची पुष्टी झाली. विस्कॉन्सिनच्या मिलवॉकीमधील द मक्का स्पोर्ट्स बार आणि ग्रिलसाठी केलेला हा एक भाग होता असं न्यूजवीकने दिलेल्या अहवालाची पुष्टी केली. गुगल मॅपद्वारे हे स्थान शोधायचा प्रयत्न केला गेला आणि त्या जागेवरची काही चिन्हे बघून याची हा व्हिडिओ कधीचा आहे हे लक्षात आलं.

काही ट्विटर वापरकर्त्यांनी असेही निदर्शनास आणले की व्हिडीओमध्ये प्रत्यक्षात एनबीए टीम, मिलवॉकी बक्सचे चाहते आहेत. जुलैमध्ये, हरण जिल्ह्यातील रस्त्यावर “एनबीए फायनलच्या गेम ६ साठी” गर्दी साजरी करत असल्याचे कळले. चित्रांसह शिकागो ट्रिब्यूनचा अहवाल देखील पुष्टी करतो की अंतिम फेरीसाठी २० जुलै रोजी चाहते फिसर्व्ह फोरमच्या बाहेर जमले होते.

शिवाय, एनबीएच्या अधिकृत ट्विटर पेजद्वारे पोस्ट केलेला व्हिडीओ मेस्सीच्या चाहत्यांच्या क्लिपच्या रूपात सामायिक केलेल्या व्हिडीओसारखाच आहे.  याचं लोकेशन देखील एकसारखी आहेत.यावरूनच , हे स्पष्ट आहे की व्हायरल व्हिडिओमध्ये चाहते मेस्सीच्या स्वागतासाठी पॅरिसच्या रस्त्यावर गर्दी करत असल्याचे दिसत नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Does this viral video show 3 lakh fans waiting for lionel messi in paris ttg

ताज्या बातम्या