हरयाणा परिवहन महामंडळाच्या बस चालकाने भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला भीषण अपघातामधून वाचवण्यासाठी मदत केली. पंतच्या मर्सिडीज गाडीमधून त्याला बाहेर पडून गाडी जळण्याआधी दूर नेणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये या चालकाचाही समावेश होता. मात्र पंतला मदत करणाऱ्या या बस चालकाला जखमी व्यक्ती नेमकी कोण आहे याचा हीच अंदाज नव्हता अशी माहिती समोर आली आहे. या बस चालकाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर लोकांच्या मदतीने रुग्णवाहिकेला बोलावून घेतलं.

सुशील मान असं या बस चालकाचं नाव आहे. सुशील यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या माहितीनुसार समोरुन फार वेगाने एक एसयुव्ही गाडी आली आणि ती दुभाजकाला धडकली. “मी बस बाजूला घेतली आणि खाली उतरुन अपघात झालेल्या गाडीच्या दिशेने धावलो,” असं सुशील यांनी सांगितलं. “ज्या वेगात अपघात झाला ते पाहता ही गाडी आपल्या बसला आदळेल असं मला वाटलं. कारण धडक दिल्यानंतर गाडीने अनेकदा पलटी मारली आणि नंतर ती थांबली,” असं सुशील म्हणाले.

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

नक्की पाहा >> Rishabh Pant Car Accident Photos: काळ आला होता पण…; क्षणात खाक झाली पंतची स्पोर्ट्स कार; रुग्णालयातील फोटोही आले समोर

“गाडीचा चालक (पंत) खिडकीमधून अर्थवट बाहेर आलेल्या अवस्थेत होता. त्याने मला तो क्रिकेटपटू असल्याचं सांगितलं,” असं सुशील मान म्हणाले. तसेच पंतने मला त्याच्या आईला फोन लावण्यास सांगितलं. मात्र त्याचा फोन बंद होता, असंही सुशील मान या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

नक्की वाचा >> Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत आणि सायरस मिस्त्रींच्या अपघातामधील विचित्र साम्य

“मी क्रिकेट पाहत नाही मला ऋषभ पंत कोण आहे हे ठाऊक नाही. मात्र माझ्या बसमधील इतर लोकांनी त्याला ओळखलं,” असं सुशील यांनी सांगितलं. “पंतला कारमधून बाहेर काढल्यानंतर आम्ही लगेच त्याच्या कारमध्ये काही सामन आहे का तपासलं. मी त्याच्या निळ्या रंगाच्या बँगमधून सात ते आठ हजार रुपये काढून तो रुग्णवाहिकेमध्ये बसलेला असताना त्याच्या हातात टेकवले,” असं सुशील म्हणाले.

नक्की वाचा >> Rishabh Pant Car Accident: “गरज पडल्यास त्याच्यासाठी…”; उत्तराखंडच्या CM चे निर्देश! जाणून या अपघातासंदर्भातील १० अपडेट्स

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंतला डुलकी लागल्याने हा अपघात झाला. पंत त्याच्या मूळ गावी रुरकीला जात असतानाच हा अपघात झाला.