आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जवळपास १० वर्षांनी माजी कर्णधार राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पूर्णवेळ परतणार आहे. द्रविडने आतापर्यंत राष्ट्रीय संघात दोन वेळा अर्धवेळ काम केले आहे आणि तो पहिल्यांदाच पूर्णवेळ जबाबदारी स्वीकारणार आहे.

राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघासह जगभरात प्रवास करेल आणि किमान 3 ICC स्पर्धांमध्ये – T20 विश्वचषक, 50-विश्वचषक आणि चालू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करेल. टीम इंडिया व्यतिरिक्त, द्रविडने २ आयपीएल फ्रँचायझी, भारत अ संघ आणि १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. म्हणून, तो ८ वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या समृद्ध कोचिंग अनुभवासह राष्ट्रीय संघात पुन्हा सामील झाला. मुख्य प्रशिक्षकपदी द्रविडच्या नियुक्तीला क्रिकेट जगताने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा – क्या बात..! टीम इंडियाचा हेड कोच बनल्यानंतर राहुल द्रविडची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “पुढील दोन वर्षात…”

भारताचा माजी कर्णधार आणि फलंदाज अजय जडेजाने या नियुक्तीवर आपली भूमिका मांडताना बीसीसीआयला विशेष विनंती केली आहे. क्रिकबझशी बोलताना जडेजाने बीसीसीआयला विनंती केली आहे की, द्रविडला संघ कसा चालवायचा हे सांगू नका आणि त्याला स्वतःच्या दृष्टीनं हे काम करू द्या. “शिस्त आणि समर्पणाचा आदर्श असेल तर तो राहुल द्रविड आहे. तुम्हाला प्रशिक्षकाकडून खूप काही हवं असतं पण शिस्त आणि समर्पण या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पुढचा T20 कर्णधार कोण बनवणार हे पाहणं रंजक ठरेल. त्याच्या वैयक्तिक स्तुतीत काही शंका नाही पण जेव्हा कोणी भारतीय प्रशिक्षक बनतो, जर तुम्ही त्याला काम करू दिले नाही किंवा त्याची दृष्टी वापरली नाही तर हे सर्व निरर्थक आहे.

“म्हणून जर तुम्ही राहुल द्रविड या सर्वात मोठ्या नावाला आणले असेल तर किमान त्याच्या व्हिजनसह जा. ही माझी बोर्डाला विनंती आहे… राहुल द्रविडसारखा माणूस सामील झाला असेल तर कृपया, त्याची दृष्टी, समज आणि सोबत घेऊन पुढे जा. संघ कसा चालवायचा ते त्याला सांगू नका.”, असंही जडेजा म्हणाला. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ सुरू करणार आहे.