बोरूसिया डॉर्टमंडने चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड करत बायर्न म्युनिकवर ४-२ असा विजय मिळवून जर्मन सुपर चषकावर नाव कोरले. दोन गोल झळकावणारा मार्को रेऊस बोरूसिया डॉर्टमंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
 ‘‘आमच्यासाठी अविस्मरणीय असा हा विजय आहे. या सामन्यासाठी आम्ही तीन आठवडे मेहनत घेतली होती. त्याचे फळ आम्हाला मिळाले. या मोसमात बायर्न म्युनिक हा आमच्यासाठी प्रतिस्पर्धी नाही. अन्य १६ संघांचेही तितकेच कडवे आव्हान असेल,’’ असे डॉर्टमंडचे प्रशिक्षक जर्गन क्लोप यांनी सांगितले.