Paris Olympic 2024 Manu Bhaker: भारताची २२ वर्षीय नेमबाजी मनू भाकेर पदकांची हॅटट्रिक साधण्यापासून थोडक्यासाठी चुकली. पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics 2024) २५ मीटर पिस्तूलमध्ये ती चौथ्या स्थानावर राहिली. शेवटच्या क्षणी ती टॉप-३ मधून बाहेर पडली, तर त्याआधी ती सुवर्णपदकाची दावेदार होती. मनूने सुरूवातीला ५ पैकी २ शॉट लगावत फारशी चांगली सुरूवात झाली नाही. ती सहाव्या स्थानावर होती, पण नंतर ५ पैकी ४ गुण तिने गाठले. मग ती चौथ्या स्थानावर पोहोचली आहे आणि इथून तिने जबरदस्त कमबॅक केलं. पण अखेरच्या सीरिजमध्ये ती एका शॉटपासून चुकली. मात्र तिच्या या कामगिरीचं प्रचंड कौतुक होतं आहे. मनू भाकेर आज भारतात परतली.

एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू

२२ वर्षीय भाकेरने (Manu Bhaker) महिलांच्या फायनलमध्ये २८ गुण मिळवले आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण करण्यास ती चुकली. तिला शूटऑफमध्ये कांस्यपदक विजेत्या हंगेरीच्या वेरोनिका मेजरकडून पराभव पत्करावा लागला. यापूर्वी मनूने १० मी एअर पिस्तुल एकेरी आणि मिक्स्डमध्ये सरबज्योत सिंगसह दोन कांस्यपदकं जिंकली. भाकेरपूर्वी, कोणत्याही भारतीय खेळाडूने (स्वतंत्र भारत) एकाच ऑलिम्पिकमध्ये एकापेक्षा जास्त पदके जिंकलेली नाहीत. मनू भारतात आल्यानंतर तिने खास शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. आज ढोल ताशांच्या गजरात तिचं स्वाग करण्यात आलं.

हे पण वाचा- Paris Olympics 2024: मनू भाकेरला भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिली मोठी जबाबदारी, ऐतिहासिक कामगिरीनंतर ११ ऑगस्टला…

मनू भाकेरने काय म्हटलं आहे?

“भारतासाठी पदकं जिंकल्याचा मला खूप खूप आनंद झाला आहे. आपले अॅथलिट्स यापुढेही चांगली कामगिरी करतील असा मला विश्वास आहे. अनेक पदकं भारताला मिळाली पाहिजेत असंही मत मनू भाकरने व्यक्त केलं आहे. पॅरीस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदकं तिने जिंकली आहेत. एकेरी आणि दुहेरी या दोन्ही प्रकारांमध्ये कांस्य पदक जिंकलं. आज ढोल ताशांच्या गजरात मनूचं जोरदार स्वागत केलं. यावेळी हात उंचावून मनूने (Manu Bhaker) अभिवादन केलं.

मनू भाकेरने ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास

मनू भाकेरने अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केली, पण त्याची एक चूक त्याला महागात पडली. शूट-ऑफ टायब्रेकरनंतर चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर मनू भाकेरला एलिमिनेशनचा सामना करावा लागला. मनू भाकेरला या फेरीत ५ शॉट्स घ्यावे लागले. मनू भाकेरला या ५ पैकी केवळ ३ शॉट मारता आले आणि तिचा स्कोअर १०.२ होता. तर, चौथ्या स्थानावर असलेल्या वेरोनिकाने लक्ष्यावर ४ शॉट्स मारले. यामुळे मनू भाकेरचे स्वप्न भंगले आणि तिला अवघ्या १ शॉट चुकल्याने तिसरे पदक जिंकता आले नाही. तरीही २२ वर्षीय तरुणीने अद्वितीय कामगिरी केली. यानंतर ती भारतात परतली आहे. आपल्याला पदक जिंकल्याचा खूप आनंद झाला असं तिने म्हटलं आहे.