पुण्याचे डॉ. कौस्तुभ राडकर यांनी आपली २९ वी आयर्न मॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. आयर्न मॅनसाठी पोहणे, धावणे आणि सायकल चालवणे अशा तिन्ही स्पर्धांमध्ये शारीरिक क्षमतेची कसोटी असते. या स्पर्धेत ३.८ किमी पोहणे, १८०.२ किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी धावणे अशी स्पर्धा असते. ही स्पर्धा १७ तासात पूर्ण करायची असते. हे आव्हान डॉ. कौस्तुभ राडकर यांनी १३ तास १४ मिनिटं आणि १६ सेकंदात पूर्ण केलं. त्यामुळे त्यांना आयर्न मॅन टायटल मिळालं आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी माझी २९ वी आयर्नमॅन स्पर्धा स्पेनच्या मलोर्का येथे यशस्वीरित्या पूर्ण केली. ही स्पर्धा पूर्ण करणारे जगात मूठभर लोकं आहेत. “, असं ट्वीट डॉ. कौस्तुभ राडकर यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी या कामगिरीबाबत फेसबुकवरही लिहिलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr kaustubh radkar first indian to finish 29 full ironman triathlon rmt
First published on: 18-10-2021 at 21:22 IST