scorecardresearch

‘…म्हणून Yuvraj Singh आणि त्याच्या भावाला आईने घराबाहेर हाकलले’; पाहा मजेदार VIDEO

Yuvraj Singh Video: रणबीर कपूर स्टारर रॉकस्टार चित्रपटातील ‘कुन फया कुन’ हे प्रसिद्ध गाणे सध्या ट्रेंडमध्ये आहे. या ट्रेंडमध्ये एक रील तयार केली जात आहे. यामध्ये एका व्यक्तीला अतिशय मजेशीर कारणासाठी घराबाहेर हाकलून दिले जाते.

Yuvraj Singh Video
युवराज सिंग (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो जे काही करतो त्याबद्दल त्याच्या चाहत्यांना अपडेट देत असतो. त्याला त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी व्हायरल इंस्टाग्राम ट्रेंड आणि डांस चॅलेंज स्वीकारणे देखील आवडते. आता त्याच्या इन्स्टाग्रामवर ताज्या पोस्टमध्ये त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे.

त्याने त्याची आई शबनम सिंग आणि भाऊ जोरावर सिंग यांच्यासोबत व्हायरल होत असलेल्या ‘कुन फया कुन’ ट्रेंडवर रील बनवली आहे. त्याने व्हिडिओ शेअर करताना त्याला कॅप्शन दिले, “सांगा, आम्ही काय चूक केली का?”

रणबीर कपूर स्टारर रॉकस्टार चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘कुन फया कुन’ सध्या ट्रेंडमध्ये आहे. या ट्रेंडमध्ये एक रील तयार केली जात आहे. यामध्ये एका व्यक्तीला अतिशय मजेशीर कारणासाठी घराबाहेर हाकलून दिले जाते. युवराज सिंगने त्याचा भाऊ जोरावर आणि आई शबनम यांच्यासोबत खूप मजेदार रील बनवली आहे. या तिघांनीही उत्कृष्ट अभिनय केला आहे.

हेही वाचा – Jaspreet Bumrah: ‘बुमराह एमआयसाठी सात सामने खेळला नाही तर जग संपणार नाही’; माजी दिग्गज खेळाडूचे वक्तव्य

कोथिंबीर ऐवजी पुदिना आणला –

युवराज सिंगने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये, त्याच्या आईने त्याला आणि त्याच्या भावाला त्यांच्या सामानासह घराबाहेर हाकलले आहे. कारण त्यांनी कोथिंबीरऐवजी पुदिना आणला होता. व्हिडिओमध्ये लिहिले आहे, “काही नाही भाऊ, आईने भाजी आणायला पाठवले होते, आम्ही कोथिंबीर ऐवजी पुदिना आणला होता.” त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही खालील इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पाहू शकता.हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –

टीम इंडियाला २००७ साली टी-२० विश्वचषक आणि २०११ साली एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यात युवराजने महत्त्वाची भूमिका बजावली. अशा प्रकारेयुवराज सिंगची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चांगली आहे. त्याने ४० कसोटीत ३३.९३ च्या सरासरीने १९०० धावा केल्या. ३०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३६.५६ च्या सरासरीने ८७०१ धावा केल्या. टी-२० मध्ये त्याने ५८ सामन्यात २८.०२ च्या सरासरीने ११७७ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने कसोटीत ९, एकदिवसीय सामन्यात १११ आणि टी-२० मध्ये २८ विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 17:45 IST