भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन आश्विन आगामी देवधर चषक स्पर्धेला मुकणार आहे. पाठदुखीच्या आजारामुळे आश्विन या स्पर्धेत खेळणार आहे. भारत अ संघाचं नेतृत्व रविचंद्रन आश्विनकडे सोपवण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आश्विन एक आठवड्याची विश्रांती घेणार आहे. त्यामुळे आश्विनऐवजी महाराष्ट्राच्या अंकित बावनेकडे भारत ‘अ’ संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे.

४-८ मार्चदरम्यान धर्मशाळा येथे देवधर चषकाचे सामने रंगणार आहेत. मात्र एप्रिल महिन्या होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांमुळे आश्विनने विश्रांती घेणं पसंत केलं आहे. आश्विनऐवजी फिरकीपटू शाहबाज नदीमला भारत ‘अ’ संघात स्थान देण्यात आलेलं आहे. तर अक्षदीप नाथला भारत ब संघात स्थान देण्यात आलं आहे.

देवधर चषकासाठी भारत ‘अ’ संघ –

अंकित बावने (कर्णधार), पृथ्वी शॉ, उन्मुक्त चांद, शुभमन गिल, रिकी भुई, सुर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, बसिल थम्पी, कुलवंत खेजरोलीया, अमनदीप खरे आणि रोहित रायडू