डुसेनमुळे आफ्रिकेची विजयी सांगता

शारजा येथे झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १७९ धावाच करता आल्या.

शारजा : ऱ्हासी वॅन डर डुसेनची (६० चेंडूत नाबाद ९४) उत्कृष्ट फलंदाजी आणि कॅगिसो रबाडाच्या (३/४८) हॅट्ट्रिकमुळे दक्षिण आफ्रिकेने शनिवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकातील ‘गट-१’मधील अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा १० धावांनी पराभव केला.

शारजा येथे झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १७९ धावाच करता आल्या. सलामीवीर जेसन रॉय (२०) आणि जोस बटलर (२६) यांनी आक्रमक सुरुवात केली. रॉयला पायाच्या दुखापतीमुळे माघारी परतावे लागले. बटलर आणि जॉनी बेअरस्टो (१) बाद झाल्यावर मोईन अली (३७) आणि डेविड मलान (३३) यांनी फटकेबाजी केली. मग लियम लिव्हिंगस्टोन (२८) आणि कर्णधार ईऑन मॉर्गन (१७) यांनी इंग्लंड विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आले.

तत्पूर्वी, आफ्रिकेने २० षटकांत २ बाद १८९ अशी धावसंख्या उभारली. रीझा हेन्ड्रिक्स (२) लवकर बाद झाल्यावर क्विंटन डीकॉक (३४) आणि डुसेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर डुसेन आणि एडिन मार्करम (नाबाद ५२) यांनी १०३ धावांची फटकेबाज भागीदारी केल्याने आफ्रिकेने मोठी धावसंख्या उभारली.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका : २० षटकांत २ बाद १८९ (ऱ्हासी वॅन डर डुसेन नाबाद ९४, एडिन मार्करम नाबाद ५२; मोईन अली १/२७) विजयी वि. इंग्लंड : २० षटकांत ८ बाद १७९ (मोईन अली ३७; कॅगिसो रबाडा ३/४८)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dussen concludes africa victory ysh

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या