भारतीय अ‍ॅथलीट द्युती चंदची बहीण अंजना चंद हिचे नुकतेच लग्न झाले. यावेळी द्युती तिची लेस्बियन पार्टनर मोनालिसासोबत उपस्थित होती. द्युतीने तिच्या बहिणीच्या लग्नानंतर जोडीदारासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याचा फोटो शेअर केल्यानंतर द्युतीने मोनालिसासोबत लग्न केल्याचं वृत्त सगळीकडे व्हायरल होऊ लागलं. द्युतीने आपली समलैंगिक साथीदार मोनालीसा हिच्याशी लग्नगाठ बांधल्याची चर्चा सुरू झाली. समलैंगिक संबंध स्विकारून विवाह करणारी द्युती पहिली भारतीय खेळाडू ठरल्याचंही बोललं जाऊ लागलं.

‘तो’ फोटो द्युतीच्या बहिणीच्या लग्नातला?

यासंदर्भात द्युतीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय, तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटो कॅप्शनमध्येही त्याबाबत काही जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे द्युतीचा विवाह झाला नसून व्हायरल होणारा फोटो एकच दिवस आधी झालेल्या तिच्या बहिणीच्या लग्नातला असल्याची माहिती आता समोर आली आहे.

baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
pimpri chinchwad marathi news, 17 year old boy killed his minor friend marathi news
पिंपरी चिंचवड : १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Mohammed Shami's social media post after surgery
Mohammed Shami : ‘बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी…’, शस्त्रक्रियेनंतर शमीने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Photos: अ‍ॅथलीट द्युती चंदने समलिंगी जोडीदारासह बांधली लग्नगाठ? जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य

“मी तुझ्यावर आधीही प्रेम करत होते आणि आताही करत राहिल”, असे म्हणत तिने इंस्टाग्रामवर तिची पार्टनर मोनालिसा हिच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. तिने ट्विट करत लिहिले आहे, ”तुझ्यावर कालही प्रेम केलं आणि नेहमीच करत राहीन.” द्युतीने शेअर केलेल्या या फोटोला ट्विटरवर जवळपास १० हजार लोकांनी लाइक केले आहे. तर २०० हून अधिक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया युजर्स द्युतीच्या या निर्णयाचे स्वागत करताना दिसत आहेत. द्युतीने शेअर केलेल्या फोटोला इंस्टाग्रामवरही जवळपास ११ हजार लोकांनी लाईक करत पसंती दर्शवली आहे.

भारताची अव्वल धावपटू द्युतीने तीन वर्षांपूर्वीच आपण समलैंगिक असल्याचा खुलासा केला होता. मात्र, तिने आपल्या साथीदाराचे नाव उघड करण्यास नकार दिला होता.‌ केवळ‌ ती आपल्या नातेसंबंधांतील असल्याचे तिने स्पष्ट केले होते. विदेशातील अनेक खेळाडू समलैंगिक असल्याचे स्वीकारत विवाह करत असतात.

हेही वाचा :   धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण असू शकतो? यावर सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा

महान धावपटू पीटी उषा हिची शिष्य असलेली द्युती सध्या भारताच्या सर्वात वेगवान महिला धावपटूंपैकी एक आहे. २०१४ मध्ये तिच्यावर पुरूष असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र, हार्मोन्सच्या असंतुलनामुळे तिच्यात काहीशी जास्त ताकद असल्याचे नंतर समोर आले. १०० मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या द्युतीने आशियाई खेळांमध्ये दोन रौप्य पदके आपल्या नावे केली आहेत. तिने एशियन चॅम्पियनशिपमध्येही कांस्य पदक जिंकले होते. द्युतीने २०१३ आणि २०१७ मध्येही पदके जिंकली आहेत.