scorecardresearch

ENG vs WI: धाकट्या भावाची वेस्ट इंडिजच्या संघात निवड न झाल्याने डीजे ब्राव्हो संतापला; म्हणाला, “दिग्गज खेळाडू असूनही…”

ENG vs WI ODI Series Update: इंग्लंडचा क्रिकेट संघ डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या कालावधीत, ते यजमानांसोबत ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

ENG vs WI ODI Series Update in marathi
ड्वेन ब्राव्होने इंस्टाग्रामवर पोस्टसह भाऊ डॅरेन ब्राव्होसोबतची ही छायाचित्रेही शेअर केली आहेत.

Dwayne Bravo raised questions on the board after announcing the West Indies squad for the ODI : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या घरच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. १५ सदस्यीय संघात शेरफेन रदरफोर्ड आणि मॅथ्यू फोर्ड या अष्टपैलू खेळाडूंच्या रूपाने दोन नवीन चेहऱ्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र गेल्या १० डावांमध्ये एक शतक आणि ३ अर्धशतके झळकावणाऱ्या डॅरेन ब्राव्होला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचा मोठा भाऊ ड्वेन ब्राव्हो वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर चांगलाच संतापला आहे.

याबाबत ड्वेन ब्राव्होने आपल्या धाकट्या भावाची निवड झाल्याने सोशल एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. यामध्ये संघ निवडीच्या निकषांवर त्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने दिग्गज क्रिकेटपटूंची उपस्थिती असतानाही यंत्रणा पुन्हा बिघडल्याची नाराजीही व्यक्त केली आहे.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS: आश्विन ११ वर्षानंतर चेन्नईत वनडे खेळण्यासाठी सज्ज! आयसीसीने शेअर केला ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणारा VIDEO
World Cup 2023 Updates
World Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे ‘या’ दिग्गज खेळाडूचे खेळणे कठीण
IND vs AUS 1st ODI: Shreyas Iyer who returned from injury in the first match of the series dropped David Warner's catch
IND vs AUS 1st ODI: श्रेयस अय्यरने सोडलेला झेल टीम इंडियाला पडला महागात, डेव्हिड वॉर्नरचे शानदार अर्धशतक
IND vs AUS 1st ODI Match Updates
IND vs AUS 1st ODI: मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलियाला पहिल्याच षटकात मोठा धक्का! मिचेल मार्शला धाडले तंबूत, पाहा VIDEO

भावाची निवड न झाल्याने आश्चर्य वाटले नाही: डीजे ब्राव्हो

ड्वेन ब्राव्होने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले की, “माझ्या भावाची निवड न झाल्याने मला आश्चर्य वाटत नाही, परंतु वेस्ट इंडिज क्रिकेट व्यवस्थापनात अलीकडेच झालेल्या बदलांनंतर मला चांगल्या अपेक्षा होत्या. मला यापैकी काहीही समजू शकले नाही! मला काही प्रश्न आहेत: वेस्ट इंडिज संघ निवडीचे निकष काय आहेत? नक्कीच, हे केवळ कामगिरीवर आधारित असू शकत नाही?”

हेही वाचा – India vs Qatar: फुटबॉलमध्ये टीम इंडिया करणार कतारशी दोन हात, फिफा विश्वचषक पात्रता फेरीत भारत प्रवेश करेल का?

हे कधी थांबणार – डीजे ब्राव्हो

डीजे ब्राव्होने पुढे लिहिले, “माझ्या भावाने दोन सीझनमध्ये विलक्षण प्रतिभा दाखवली आहे. त्याने ८३.२ च्या सरासरीने आणि ९२ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत ४०० हून अधिक धावा केल्या आहे. तसेत करून नवीनतम स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. मी सहसा या चर्चांपासून दूर राहतो, पण वर्षानुवर्षे खेळाडूंवर होत असलेल्या अन्यायावर, अनादर आणि अप्रामाणिकपणाविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे झाले आहे. हे कधी थांबणार?”

आपले बोलणे चालू ठेवत डीजे ब्राव्हो म्हणाला, “मिस्टर डेसमंड हेन्स, तुमचे विधान मला आश्चर्यचकित करत नाही. तुमच्या, सॅमी आणि क्रिकेटचे नवे संचालक यांच्यासारख्या लोकांचा व्यवस्थेवर विश्वास असेल, अशी मला अपेक्षा होती, पण ही यंत्रणा पुन्हा अपयशी ठरली आहे. माझ्या भावाची ही वेळ देखील जाईल.’’आपल्या भावाचे सांत्वन करताना डीजे ब्राव्होने लिहिले, ‘तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा, लक्ष केंद्रित करा आणि सर्वशक्तिमान देवावर विश्वास ठेवा. नेहमीप्रमाणे मी संघ आणि निवड झालेल्या खेळाडूंना माझ्या शुभेच्छा देतो. ओटले, रदरफोर्ड आणि डाउरिच यांना संघात परत पाहणे चांगले आहे. शुभेच्छा मित्रांनो!’

हेही वाचा – IND vs AUS Final: “अतिआत्मविश्वास तुम्हाला…”, टीम इंडियाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचा ‘तो’ VIDEO व्हायरल

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ –

शाई होप (कर्णधार), अॅलेक अथनाजे, यानिक कारिया, केसी कार्टी, रोस्टन चेस, शेन डॉवरिच, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रॅंडन किंग, गुडाकेश मोती, केजॉर्न ओटली, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, ओशाने थॉमस.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dwayne bravo raised questions on the board after announcing the west indies squad for the odi series against england vbm

First published on: 21-11-2023 at 13:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×