VIDEO : ‘चॅम्पियन’नंतर डीजे ब्रावो नवीन गाण्याच्या तयारीत व्यग्र

गाण्यात विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनीच्या नावाचा उल्लेख

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावो केवळ उत्कृष्ट क्रिकेटपटू नसून, गतवर्षी आलेल्या त्याच्या चॅम्पियन गाण्याने ब्रावोला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. ‘चॅम्पियन’ या लोकप्रिय गाण्यात त्याने आफ्रिकेतील प्रसिद्ध व्यक्तिंच्या नावांचा उल्लेख केला होता. तर नवीन गाण्यात तो प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीच्या नावाचा उल्लेख करताना दिसेल. सध्या हे गाणे निर्मिती अवस्थेत आहे. असे असले तरी केवळ एक मिनिटाच्या या ‘रिहर्सल व्हिडिओ’ने यूट्युबवर काही तासांमध्ये हजारोंनी व्ह्यूज मिळविले आहेत.

याआधीदेखील ‘आयपीएल’दरम्यान भाऊ डेरेन ब्रावोसोबत गप्पा मारताना तो नजरेस पडला होता. ड्वेन एका नव्या गाण्याची तयारी करत असल्याचे त्याचा हा व्हिडिओ पाहून लक्षात येते. गाण्याच्या मुखड्यामध्ये विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनीचा उल्लेख आहे. आपल्या विशिष्ट शैलीत त्याने हे गाणे गायले आहे.

हिंदी चित्रपटात काम करण्याची इच्छा असलेला वेस्ट इंडिजचा हा स्टार क्रिकेटपटू बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा चाहता आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसदेखील त्याला खूप आवडते. बॉलिवूडमध्ये अभिनयाची संधी मिळाल्यास करण जोहर दिग्दर्शित चित्रपटाचा हिस्सा व्हायची त्याची इच्छा आहे. याआधी ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोच्या ९व्या पर्वामध्ये दिसलेल्या ड्वेनला भारतीय मनोरंजन क्षेत्राचा हिस्सा व्हायला कमालीचे आवडते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dwayne bravo sings a song on indian cricketer virat kohli and mahendra singh dhoni