Brendon McCullum Sacked From Head Coach: न्यूझीलंडचा माजी स्टार फलंदाज ब्रँडन मॅक्युलम सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळताना इंग्लंडने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये बॅझबॉल सुरु करणाऱ्या ब्रँडन मॅक्युलमला इंग्लंड क्रिकेट बोर्ड मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, ब्रँडन मॅक्युलमला कसोटी क्रिकेटमधील मुख्य प्रशिक्षक पदावरुन काढून टाकले जाणार आहे. तर तो वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहू शकतो.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाला काही दिवसांपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. इंग्लंडचा संघ या धक्क्यातून बाहेर येणार, त्याआधीच इंग्लंडला आणखी एक धक्का बसणार आहे. ज्यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये बॅझबॉल सुरु झालं, त्यावेळी बेन स्टोक्स आणि ब्रँडन मॅक्युलमच्या जोडीने इंग्लंडला अनेक मोठ्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिले होते. पण याच मालिकेत बेन स्टोक्सने इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे नियम मोडत नाईट क्लबमध्ये वाद केला होता. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर पुढच्याच सामन्यात त्याने निवृत्तीची घोषणा केली होती.
७ क्रिकेटचे वरिष्ठ पत्रकार टॉम मॉरिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून लवकरच ब्रँडन मॅक्युलमला वगळल्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. इंग्लंडला या वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रँडन मॅक्युलमच्या मार्गदर्शनाखाली खेळताना, भारत- इंग्लंड कसोटी मालिका बरोबरीत राहिली होती. त्यानंतर अॅशेस मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेतही इंग्लंडला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला आहे.
ब्रँडन मॅक्युलमला कसोटी क्रिकेटमधून बाहेर केल्यानंतर, लवकरच नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली जाऊ शकते. बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर आता इंग्लंडला नवा कसोटी कर्णधार मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. आता इंग्लंड क्रिकेट बोर्ड अधिकृत घोषणा करणार का? आणि ब्रँडन मॅक्युलमनंतर कोण होणार इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
