‘आयपीएल’वर सट्टेबाजी

आठ जणांना अटक

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आठ जणांना अटक

शहरातील अशोका मार्ग परिसरात असलेल्या विधातेनगरजवळ ठक्कर्स इस्टेटमधील बंगल्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या नागपूर आणि बिहार येथील आठ जणांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत अटक केली. या कारवाईत साडे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या बाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर गुन्हे शाखेला आयपीएलवर सुरू असलेल्या सट्टेबाजाराची माहिती मिळाली. बुधवारी रात्री कोलकता नाईट रायडर्स विरूध्द सनराईज हैद्राबाद हा सामना होता. याच वेळी संशयितांनी टीव्हीवर क्रिकेट सामन्याचे प्रक्षेपण पाहत सट्टा खेळणाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देण्यास सुरूवात केली. पैज लावत जुगार खेळण्यास सुरूवात करत असतांना पथकाने रात्री छापा टाकत संशयितांना ताब्यात घेतले. त्यात लोकेश उर्फ लकी खत्री , शरद नाकोते, महमंद शहवाज इजाज शेख, राजेश काळे, साजित बघ्त (३०, गोंदिया), अमत त्रिवेदी (३३, नागपूर), सुरज कमती (४०, बिहार) व राजेश कमती (२२, बिहार) यांचा समावेश आहे. यावेळी एक लाख ७९ हजार रुपये किंमतीचे भ्रमणध्वनी, ९० हजार रुपयांचे तीन लॅपटॉप, एक एलईडी टीव्ही, सेट टॉप बॉक्स, एक लाख २० हजार किंमतीच्या पाच लाईन पेटी, पेनड्राईव्ह, दूरध्वनी, रेकॉर्डर व वेगवेगळ्या कंपन्याचे सीमकार्ड, असा चार लाख २२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Eight people arrested in ipl match fixing

ताज्या बातम्या