ICC Womens T20 World Cup 2024: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेच्या आधारे ८ संघ टी-२० विश्वचषक २०२४ च्या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. त्यापैकी एक यजमान देश आहे, तर ७ संघांना क्रमवारी आणि गुण सारणीच्या आधारे पात्रता टॅग मिळालेला आहे. यामध्ये भारतीय संघाचाही समावेश आहे.
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ साठी पात्र ठरलेले संघ दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या मेगा इव्हेंटच्या आधारावर निश्चित केले गेले आहेत. ज्यामध्ये या वर्षी खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील गट १ आणि २ मधील पहिल्या तीन संघांना थेट स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर बांगलादेश यजमान राष्ट्र थेट पात्र ठरले आहे. याशिवाय टॉप रँक संघानाही स्थान मिळाले आहे.
महिला टी-२० विश्वचषक २०२३ च्या गट गुण सारणीवर आधारित, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांना गट १ मधून स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर इंग्लंड, भारत आणि वेस्ट इंडिज यांना गट २ मधून पात्र होण्याची संधी मिळाली आहे. बांगलादेशचे यजमानपद आणि अव्वल क्रमांकाचा संघ असल्याने पाकिस्तानला आपोआप पात्रता मिळाली आहे.
त्याच वेळी, श्रीलंका आणि आयर्लंडसारखे संघ या १० संघांच्या स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. अशा स्थितीत त्यांना पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या ग्लोबल क्वालिफायर्सच्या माध्यमातून स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची संधी मिळेल. मात्र ही स्पर्धा कधी खेळवली जाईल, हे आयसीसीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
महिला टी-२० विश्वचषक २०२४ पात्र संघ –
बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज,