scorecardresearch

Premium

Asian Games स्पर्धेपूर्वी इलावेनिल वालारिवनचा डबल धमाका, ISSF विश्वचषक स्पर्धेत जिंकले दुसरे सुवर्णपदक

Elavenil Valarivan wins second gold: इलावेनिलने २५.२.२ गुण मिळवत फ्रान्सच्या २० वर्षीय ऑसियन मुलरचा २५१.९ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. चीनच्या झेंग जियालने तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले.

Elavenil Valarivan wins second gold
इलावेनिल वालारिवनने दुसरे सुवर्णपदक जिंकले (फोटो-ट्विटर)

Elavenil Valarivan won second gold medal in women’s 10m air rifle event: ऑलिम्पियन इलावेनिल वालारिवनने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (आयएसएसएफ) विश्वचषक रायफल/पिस्तूल स्पर्धेत शानदार कामगिरी केली. तिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात तिचे दुसरे सुवर्णपदक जिंकले. इलावेनिलने चमकदार कामगिरी केली, आठ महिलांमध्ये २४-शॉट फायनलमध्ये कधीही १०.१ पेक्षा कमी गुण मिळवले नाहीत.

इलावेनिल पात्रतेमध्ये आठव्या स्थानावर होती –

इलावेनिलने २५२.२ गुण मिळवत फ्रान्सच्या २० वर्षीय ऑसियन मुलरचा २५१.९ गुणांसह पराभव करत दुसरा क्रमांक पटकावला. चीनच्या झेंग जियालने तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले. इलावेनिलने ६३०.५ गुणांसह आठव्या स्थानावर राहून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. ऑसियन मुलरने पात्रता फेरीत ६३३.७ गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. चीनच्या झेंग जियाली आणि झेंग यू या दोन नेमबाजांशिवाय नॉर्वेची युरोपियन चॅम्पियन जेनेट हेग ड्यूस्टेडनेही अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

Former Asian marathon champion Gopi Thonakal won the Delhi Marathon sport news
गोपीने मॅरेथॉन जिंकली, पण ऑलिम्पिक पात्रतेपासून दूरच
ITTF World Table Tennis Team Championship Updates
Paris Olympics : भारतीय टेबल टेनिस संघांनी रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकसाठी ठरले पात्र
IND U19 vs AUS U19 ICC
IND vs AUS U19 WC Final : राज लिंबानीचा टिच्चून मारा, हरजस सिंगचं अर्धशतक, ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर २५४ धावांचं आव्हान
AUS U19 icc
IND vs AUS ICC U19 WC Final : पुन्हा स्वप्न भंगलं! दोन महिन्यात दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव

संदीप सिंग राहिला १४व्या स्थानावर –

पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताचा संदीप सिंग ६२८.२ गुणांसह पात्रतेमध्ये १४ व्या स्थानावर राहिला. शुक्रवारी, इलावेनिलने संदीपसह १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत ६२९.९१ चा एकत्रित गुण नोंदवले. या स्पर्धेच्या पदक फेरीत चौथे आणि शेवटचे स्थान इस्रायलला मिळाले, ज्याने ४२ संघांच्या स्पर्धेत भारतापेक्षा ०.५ गुण अधिक मिळवले. इलावेनिलने ३१४.८ तर संदीपने ३१४.३ गुण केल्या. भारतीय जोडी थोड्या फरकाने कांस्यपदकासाठीची स्पर्धा गमावली.

हेही वाचा – Asia Cup 2023 Final: विराटसोबत सेल्फी काढण्यासाठी जमली गर्दी, शुबमन, इशान आणि सूर्याला चाहत्यांनी नाही दिला भाव, पाहा VIDEO

शेवटी इस्रायलने कांस्यपदक जिंकले. जर्मनीने सुवर्णपदक तर हंगेरीने रौप्यपदक पटकावले. भारताचा १६ सदस्यीय संघ रिओ विश्वचषकात सात ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. इटली दोन सुवर्णांसह आघाडीवर आहे, तर भारत आणि आर्मेनिया संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे.

सौरभचा खराब फॉर्म कायम –

सौरभ चौधरी, गेल्या दीड वर्षातील आपली पहिली मोठी स्पर्धा खेळत आहेय. तो रिओ दि जानेरो येथे खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ (आयएसएसफ) रायफल/पिस्तूल विश्वचषकात पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये ३०व्या स्थानावर राहिला. अनेक विश्वचषक विजेत्या सौरभने फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये कैरो येथे आयएसएसफ स्पर्धेत शेवटचा सामना खेळला होता. गुरुवारी रिओमध्ये झालेल्या ६० शॉटच्या पात्रता स्पर्धेत ५७२ गुणांसह तो ३०व्या स्थानावर राहिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Elavenil valarivan won her second gold medal in the womens 10m air rifle event at the issf event vbm

First published on: 17-09-2023 at 16:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×