मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ महिला एकेरीचं जेतेपद एलेना रायबाकिना हिने पटकावलं. अंतिम फेरीत कझाकस्तानच्या एलेना रायबाकिनाने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अरायना सबालेन्काचा पराभव करून तिचे पहिले ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद जिंकले. सबालेन्काचा उत्कृष्ट रेकॉर्ड पाहता रायबाकिना हिने अंतिम फेरीत तिला नमवत जेतेपदावर नाव कोरलं.

ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ चा अंतिम सामना रॉड लेव्हर अरेना येथे खेळला गेला, जिथे दोन्ही खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली. परंतु शेवटी, रायबाकिनाच्या प्रभावी पुनरागमनामुळे तिने विजयाला गवसणी घातली. सबालेन्का या सामन्यात वर्चस्व गाजवेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु त्याउलट, रायबाकिनाविरूद्ध खेळताना ती पूर्णपणे दबावाखाली दिसली आणि अंतिम सामना २-१ च्या फरकाने गमावला.

एलेना रायबाकिना ही ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी कझाकस्तानची पहिली खेळाडू आहे. तिच्या कारकिर्दीतील हे तिचे दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे, यापूर्वी तिने २०२२ मध्ये विम्बल्डन जिंकले होते.

ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकिनाने पहिला सेट ६-४ च्या फरकाने जिंकण्यात यश मिळवलं. दुसऱ्या सेटमध्ये, सबालेन्काने शानदार पुनरागमन केलं आणि रायबाकिनाला कडवी झुंज दिली आणि तो सेट ६-४ असा जिंकून सामना १-१ असा बरोबरीत आणला. सर्वांचे लक्ष आता तिसऱ्या सेटवर होते, जिथे सबालेन्का आपला वेग कायम ठेवण्यात अपयशी ठरली आणि तिला ६-४ असा पराभव पत्करावा लागला, तर एलेना रायबाकिनाने सामना २-१ने असा जिंकला

एलेना रायबाकिनाचा याआधी २०२३ च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या एकेरीच्या अंतिम फेरीत सबालेन्काने पराभव केला होता. रायबाकिनाने आता सबालेन्काला पराभूत करत बदला घेतला. २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याच्या मार्गावर अव्वल सहा खेळाडूंना हरवणारी रायबाकिना मारिया शारापोवानंतरची दुसरी खेळाडू ठरली.

एलेना रायबाकिनाला या ऐतिहासिक विजयासह, बक्षीस रकमेत २.७५ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 252.1 दशलक्ष भारतीय रुपये) मिळाले.