IND vs ENG 4th T20I: भारतीय संघाचा चौथ्या टी-२० सामन्यातही इंग्लंडने ९ विकेट्स लाजिरवाणा पराभव करत मालिका आपल्या नावे केली आहे. इंग्लंड संघाने इतिहासात पहिल्यांदाच भारताचा टी-२० मालिकेत पराभव केला आहे. भारतीय संघ या टी-२० मालिकेत तिन्ही विभागात अपयशी ठरला. चौथ्या टी-२० सामन्यातील विजयासह इंग्लंडने मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. चौथ्या टी-२० सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यरने महत्त्वपूर्ण ८० धावा केल्या, पण गोलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. फिल सॉल्ट व हॅरी ब्रुक यांनी संघाचा चौथ्या टी-२० सामन्यातील विजय सोपा केला.

१२ वर्षांनी क्रिकेट इतिहासात भारताला पाहावा लागला नकोसा दिवस

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला व फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रेयस अय़्यरच्या ८० धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघ फक्त १५८ धावा करण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरात फिल सॉल्ट व हॅरी ब्रुकने वादळी फटकेबाजी करत फक्त १४ षटकात संघाला सहज विजय मिळवून दिला. जवळपास १२ वर्षांनंतर टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे; यापूर्वी २०१४ मध्ये एका टी-२० सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने विजय मिळवला होता, पण आता इंग्लंडने २ पेक्षा अधिक सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताला इंग्लंडने पहिल्यांदाच पराभूत केलं आहे.

तसेच, सुमारे सात वर्षांच्या कालावधीनंतर संघाने सलग टी-२० मालिका गमावल्या आहेत. आयर्लंडमधील दोन सामन्यांची मालिका गमावल्यानंतर, आता टीम इंडियाला इंग्लंडमध्येही पराभव पत्करावा लागला आहे. यासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने सलग पाच टी-२० सामने गमावले आहेत आणि एका सामना रद्द करण्यात आला.

टीम इंडियाने उभारलेल्या सन्मानजनक धावसंख्येला प्रत्युत्तर देताना इंग्लंडने धडाकेबाज सुरुवात केली आणि केवळ १३.५ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात १५९ धावांचं लक्ष्य गाठलं. इंग्लंडकडून कर्णधार हॅरी ब्रुकने ३५ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ७९ धावांची खेळी केली, तर सलामीवीर फिल सॉल्टने ९ चौकार व एका षटकारासह ४२ चेंडूंत ५९ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने एक विकेट घेतली.

टी-२० मालिकेतील ‘करो या मरो’ अशा या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आणि अव्वल फळीतील फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. मात्र, कर्णधार श्रेयस अय्यरने पुढाकार घेत ४९ चेंडूंत नाबाद ८० धावांची झुंजार खेळी केली. अय्यरच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाला २० षटकांत ७ बाद १५८ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली; पण, भारतीय गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे ही धावसंख्या अत्यंत अपुरी ठरली.

या सामन्यात श्रेयस अय्यरव्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला ३० धावांचा टप्पा गाठता आला नाही. २२ धावांसह शिवम दुबे हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, तर अभिषेक शर्माने १६ आणि वैभव सूर्यवंशीने केवळ १५ धावा केल्या. दुसरीकडे, इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी दोन बळी घेतले; तसेच विल जॅक्स आणि आदिल रशीद यांनीही प्रत्येकी एक बळी मिळवला.