भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी खेळली जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने ३६४ धावा केल्या, त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात जो रूटच्या नाबाद १८० धावांच्या खेळीच्या जोरावर ३९१ धावा केल्या. या कसोटीच्या चौथ्या दिवशीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये इंग्लंडचे खेळाडू आपल्या बुटांच्या स्पाइक्सने चेंडू दाबत आहेत आणि ते स्पाइक्सने घासण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर या घटनेचे फोटो शेअर करत नेटकऱ्यांनी याला बॉल टॅम्परिंग म्हटले आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने त्याच्याशी संबंधित एक फोटो शेअर करताना विचारले, ”काय होत आहे? हा इंग्लंडच्या खेळाडूंचा चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रयत्न आहे की करोनाला रोखण्यासाठी उपाय?”  माजी क्रिकेटपटू-समालोचक आकाश चोप्रानेही सोशल मीडियावर बॉल टॅम्परिंग? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

 

 

हेही वाचा – १४०० किमीचा पायी प्रवास करत ‘त्यानं’ गाठलं रांची; धोनी भेटला नाही म्हणून धरला ‘असा’ हट्ट!

चहापानापर्यंत भारत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटीचा चौथा दिवस आहे. चहापानापर्यंत भारताने आपल्या दुसऱ्या डावात ५३ षटकात ३ बाद १०५ धावा केल्या आहेत. तीन गडी तंबूत परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा (२९) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (२४) यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सांभाळला आहे. भारताकडे आता ७८ धावांची आघाडी आहे. चौथ्या दिवशी सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि लोकेश राहुल स्वस्तात माघारी परतले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने दोघांनाही माघारी धाडले. त्यानंतर आलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीही २० धावांवर बाद झाला.