ENG vs IND : …म्हणून इंग्लंडच्या खेळाडूंनी आपल्या दंडावर बांधली ‘काळी’ पट्टी

भारत-इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या हेडिंग्ले कसोटीचा आज दुसरा दिवस आहे.

eng vs ind heres why england players are wearing black armbands on day two
इंग्लंडच्या क्रिकेटपटूंच्या दंडावर काळी पट्टी

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचे माजी कर्णधार टेड डेक्सटर यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) ही माहिती दिली. डेक्सटर यांच्या निधनाचे दु: ख व्यक्त करण्यासाठी लीड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांच्या दंडावर काळी पट्टी बांधली.

मध्यम फळीचे फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज असलेल्या टेड यांनी १९५८ ते १९६८ दरम्यान ६२ कसोटी सामने खेळले आणि या कालावधीत ३० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्वही केले. त्यांनी ४७.८९च्या सरासरीने ४५०२ धावा काढण्याव्यतिरिक्त ६६ विकेट्सही घेतल्या. वेगवान गोलंदाजीविरूद्ध वर्चस्व गाजवलेल्या टेड डेक्सटर यांनी नऊ शतके ठोकली, त्यापैकी सहा शतकांत त्यांनी १४० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

 

 

टेड यांचे योगदान

या वर्षी त्यांना आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. ते MCCचे अध्यक्षही होते. निवृत्तीनंतर, टेड यांनी पत्रकार आणि प्रसारकाची भूमिका स्वीकारली. ते इंग्लंडच्या निवड समितीचे अध्यक्षही होते. त्याने खेळाडूंची रँकिंग सिस्टीम तयार करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली, जी नंतर आयसीसीने स्वीकारली. ही सिस्टीम आता एमआरएफ टायर्स आयसीसी प्लेअर रँकिंग म्हणून ओळखली जाते.

 

हेही वाचा – ENG vs IND : विराटमुळं वातावरण तापलं, LIVE कॉमेंट्री दरम्यान गावसकर-हुसेन यांच्यात झाला वाद

प्रथम श्रेणी कारकिर्दीत डंका

टेड यांनी १९५६ ते १९६८ या आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत २१,००० पेक्षा जास्त धावा करण्याव्यतिरिक्त ४१९बळी घेतले. आयसीसी आणि एमसीसीने टेड डेक्सटर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आयसीसीचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ अलार्डिस म्हणाले, ‘टेड डेक्स्टर हे त्यांच्या काळातील सर्वात कुशल फलंदाजांपैकी एक होते. वेगवान गोलंदाजीवर वर्चस्व गाजवण्याची त्याची क्षमता वाखाणण्याजोगी होती आणि वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघांविरुद्ध त्याची उत्कृष्ट फलंदाजी चांगलीच लक्षात आहे. निवृत्तीनंतरही, त्यांनी खेळात प्रशंसनीय योगदान दिले आणि खेळाडूंची क्रमवारी तयार करण्यास मदत केली जी आज खूप लोकप्रिय आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Eng vs ind heres why england players are wearing black armbands on day two adn

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या