ENG vs IND : मैदानात वारंवार घुसखोरी करणं ‘त्या’ भारतीय चाहत्याला पडलं महागात; पोलिसांनी त्याला…

ओव्हल कसोटीतही ‘तो’ भारताकडून गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता.

ENG vs IND : मैदानात वारंवार घुसखोरी करणाऱ्या 'त्या' भारतीय चाहत्याला पोलिसांनी डांबले तुरुंगात!
जार्वो ६९

भारत-इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये वारंवार मैदानात घुसून खेळात प्रत्यत आणणाऱ्या जार्वो ६९ चाहत्याला अटक करण्यात आली आहे. ब्रिटिश प्रँकस्टार आणि यूट्यूबर जार्वोचे पूर्ण नाव डॅनियल जार्विस आहे. मारहाणीच्या संशयावरून पोलिसांनी जार्वोला ताब्यात घेतले आहे. तो सध्या दक्षिण लंडन पोलीस स्टेशनमध्ये आहे.

शुक्रवारी, चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जार्वो मैदानावर धावत आला, तेव्हा त्याने इंग्लिश फलंदाज जॉनी बेअरस्टोला धक्का दिला. हा प्रकार इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३४व्या षटकात घडला. हे षटक उमेश यादव टाकत होता. ऑली पोप आणि जॉनी बेअरस्टो फलंदाजी करत होते. धक्का दिल्यानंतर बेअरस्टो खूपच रागात दिसत होता. जार्वोला सुरक्षारक्षकांनी ताबडतोब मैदानाबाहेर काढले.

 

हा इंग्लिश नागरिक भारतीय संघाचा चाहता आहे. जार्वोचा खरा हेतू केवळ त्याच्या कृत्यांमुळे माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणे, हा आहे. मात्र, त्याचा उर्मटपणा आता त्याला महागात पडला आहे. यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबने त्याला आजीवन लीड्स मैदानावर प्रवेश करण्यास बंदी घातली. तसेच दंडही आकारला.

हेही वाचा – ENG vs IND : मैदानात वारंवार घुसखोरी करणाऱ्या ‘जार्वो’ला पाहून हर्षा भोगले तापले; ट्वीट करत म्हणाले…

सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी जार्वोला मालिकेचा मनोरंजनकर्ता म्हटले, तर हर्षा भोगलेंनी त्याला मुर्ख आणि धोकादायक म्हटले. समालोचन करणाऱ्या वीरेंद्र सेहवागने जार्वोच्या सततच्या मैदानावर येणाऱ्या प्रश्नावर एक उपाय दिला. ”भारतात चाहते मैदानात घुसल्यावर पोलीस कसे त्यांना दांड्याने मारून बाहेर काढतात, तसे जार्वोसाठी केले पाहिजे. मग हा चाहता यापुढे कोणत्याच मैदानावर येत नाही”, असे सेहवागने सांगितले. करोनाच्या काळात चाहत्यांचा खेळाडूंशी थेट संपर्क होणे, हे चांगले नसल्याचे याआधी अनेकांनी सांगितले होते.

एका ट्विटमध्ये जार्वोने आपल्याबाबत माहिती दिली होती. “होय मी जार्वो आहे. भारतासाठी खेळणारा पहिला गोरा माणूस असल्याचा मला अभिमान आहे”, असे त्याने म्हटले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Eng vs ind jarvo 69 arrested for assault after breaching security in oval test adn

ताज्या बातम्या