ENG vs IND 5th Test: ‘विराट’सेनेची चिंता वाढवणारी बातमी; इंग्लंडच्या संघात ‘तो परत आलाय’

पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ ची आघाडी मिळवली असून मालिका अनिर्णित ठेवण्यासाठी इंग्लंडला भारताला पराभूत करावं लागणार आहे.

ENG vs IND 5th Test
पाचव्या कसोटीसाठी संघाची घोषणा इंग्लंडने केलीय (प्रातिनिधिक फोटो सौजन्य ट्विटरवरुन साभार)

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यासाठी इंग्लंडने संघाची घोषणा केलीय. इंग्लंडच्या संघामध्ये दोन बदल करण्यात आले असून डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लेच आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. मालिकेमध्ये भारताने २-१ ची आघाडी मिळवली असून मालिका अनिर्णित ठेवण्यासाठी इंग्लंडला भारताला पराभूत करावं लागणार आहे. ओव्हलवर भारताने इंग्लंडला १५७ धावांनी मात दिल्याने इंग्लंड क्रिकेटबोर्डाने धडाकेबाज फलंदाज असणाऱ्या बटलरला संघात स्थान दिलं आहे. आज म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी बटलरचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पुन्हा संघात स्थान दिलंय. सॅम बिलिंग्जला पाचव्या कसोटीमधून वगळण्यात आलंय.

नक्की पाहा हे फोटो >> आईच्या भीतीपोटी लागलेल्या सवयीमुळे बुमरा आज झालाय ‘यॉर्कर किंग’

बटलरबरोबरच लेचचाही समावेश करण्यात आला असून मोहीन आलीसोबत तो फिरकी गोलंदाज म्हणून पर्यायी खेळाडू म्हणून उपलब्ध असेल. श्रीलंका आणि भारताविरोधातील सामन्यांमध्ये सहा सामन्यांमध्ये एकूण २८ बळी घेणारा लेच मार्चनंतर कसोटी खेळलेला नाही. दुसरीकडे बटलरसारखा स्फोटक फलंदाज संघात असल्याने इंग्लंडच्या फलंदाजीला मधल्या फळीला बळकटी मिळणार आहे. २०१५ साली बटलरने पाकिस्तानविरोधातील एकदिवसीय सामन्यात ४६ चेंडूंमध्ये ठोकलेलं शतक आजही अनेकांच्या लक्षात आहे. आपल्या स्फोटक खेळीसोबतच बटलर संयमी खेळीसुद्धा करतो त्यामुळेच त्याला संघात स्थान देण्यात आलंय. १० तारखेपासून मँचेस्टरमध्ये पाचवा कसोटी सामना सुरु होणार आहे.

नक्की वाचा >> समजून घ्या : बुमराच्या घातक यॉर्करमागील तंत्र; कोणत्याही फलंदाजाला क्रीज टीकून राहणंही का होतं मुश्कील?

बटलरला कौटुंबिक कारणामुळे चौथी कसोटी खेळता आली नाही. बटलरला पुत्रप्राप्ती झाल्याने तो सुट्टीवर होता. आता तो पुन्हा उपकर्णधार म्हणून संघात आल्यास जॉन ब्रिस्टोव्ह किंवा ओली पोपेचं संघातील स्थान धोक्यात येणार आहे. आता जो रुटला जेम्स अँडरसन आणि ओली रॉबिन्स या दोघांपैकी एकाला संघात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. “अँडरसन आणि रॉबिन्स दोघांनाही भन्नाट कमागिरी केलीय. मला या दोघांनाही खेळामध्ये योगदानासाठी त्यांचा अभिमाव वाटतो. त्यांनी संघासाठी दिलेलं योगदान मोलाचं आहे. मात्र आम्हाला काही ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत,” असं म्हणत रुटने दोघांपैकी एकालाच प्लेइंग इलेव्हमध्ये संधी दिली जाईल असे संकेत दिलेत. रुटच्या संघाला भारताला पराभूत करावं लागणार आहे. नाहीतर १९८६ नंतर पहिल्यांदाच इंग्लंडचा संघ घरच्या मैदानावर दोन मालिका गमावणारा संघ ठरेल. यापूर्वी न्यूझीलंडने त्यांना पराभूत केलं होतं.

नक्की पाहा >> एक विजय अन् पाच विक्रम… विराट ‘सर्वश्रेष्ठ’ कर्णधार; रिकी पाँण्टींगला मागे टाकत केला ‘हा’ विश्वविक्रम

भारत हा फार तोलामोलाचा प्रतिस्पर्धी असल्याचं त्यांनी सिद्ध केलंय असंही रुट म्हणालाय. “भारत जगातील एक नंबरची टीम का आहेत हे त्यांनी खेळातून सिद्ध करुन दाखवलं आहे. त्यांना अर्धवट संधी असली तरी ते सामना जिंकतात,” अशा शब्दात रुटने भारतीय संघाचं कौतुक केलंय.

नक्की वाचा >> “लंच ब्रेकनंतर बुमरा माझ्याकडे आला आणि म्हणाला…”; सामन्याला कलाटणी देणाऱ्या त्या क्षणाबद्दल विराटचा खुलासा

बटलरची कामगिरी…

बटलरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये ५३ कसोटी, १४८ एकदिवसीय सामने आणि ८२ टी २० सामने खेळले आहेत कसोटीमध्ये त्याच्या नावार २ शतकं आणि १८ अर्धशतकं आहेत. कसोटीत त्याने २८०० धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने ९ शतकं आणि २० अर्धशतकांच्या मदतीने ३८७२ धावा केल्यात. टी २० मध्ये त्याने १४ अर्धशतकं केली असून एकूण १८७१ धावा केल्यात.

नक्की वाचा >> ICC T20 World Cup 2021: सुनील गावस्कर यांनी निवडला संघ; धवन, अय्यरला स्थान नाही तर ओपनर म्हणून रोहितसोबत…

पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ :

जो रूट (कर्णधार)

मोईन अली

जेम्स अँडरसन

जॉनी बेअरस्टो

रॉरी बन्र्स

जोस बटलर

सॅम करन

हसीब हमीद

डॅन लॉरेन्स

जॅक लेच

डेव्हिड मलान

क्रेग ओव्हर्टन

ऑली पोप

ऑली रॉबिन्सन

ख्रिस वोक्स

मार्क वूड

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Eng vs ind jos buttler jack leach return to england squad for 5th test against india scsg