Video : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यादरम्यान प्रेक्षकांची तुंबळ हाणामारी

ज्यावेळी मैदानावर इंग्लंडचे खेळाडू शानदार खेळ करत होते त्याचवेळी चाहते मात्र, आपापसात भांडण्यात व्यग्र होते.

British Cricket Fans Fight
फोटो सौजन्य – ट्वीटर

एखाद्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये दोन देशांच्या चाहत्यांची मारामारी झाल्याची अनेक उदाहरणे आतापर्यंत घडली आहेत. मात्र, हेडिंग्ले येथे झालेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात एकाच देशाच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. तिसरा कसोटी सामना बघण्यासाठी उपस्थित असलेल्या ब्रिटिश प्रेक्षकांची आपापसातच मारामारी जुंपल्याचा एक व्हिडिओ समोर सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

हेडिंग्ले येथे झालेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना बघण्यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सामना सुरू असताना अचानक काही चाहत्यांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रिटिश चाहते एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत असल्याचे, या व्हिडिओमध्ये दिसत आहे. जगभरताली क्रिकेट चाहते या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहेत.

हेडिंग्ले कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडच्या संघाने शानदार खेळ करत न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासोबतच इंग्लंडने न्यूझीलंडला तीन सामन्यांच्या मालिकेत व्हाईट वॉश दिला. ज्यावेळी मैदानावर इंग्लंडचे खेळाडू शानदार खेळ करत होते त्याचवेळी चाहते मात्र, आपापसात भांडण्यात व्यग्र होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eng vs nz hilarious fight breaks out among fans during headingley test match vkk

Next Story
विराट कोहलीला प्रपोज करणारी इंग्लंडची क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरसोबत गेली लंच डेटवर!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी