England vs New Zealand Highlights T20 WC 2026 Super-8: इंग्लंडने न्यूझीलंड संघाचा अखेरच्य षटकात रोमांचक विजय मिळवला. इंग्लंडच्या या विजयासह पाकिस्तानच्या सेमीफायनल गाठण्याच्या आशा कायम आहेत. तर न्यूझीलंड संघाचे सेमीफायनल क्वालिफिकेशन आता पाकिस्तान-श्रीलंका सामन्यावर अवलंबून असेल.
ENG vs NZ Super-8 T20 World Cup 2026 Highlights: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याचे हायलाईट्स
इंग्लंडचा न्यूझीलंड संघावर रोमांचक विजय, फिलिप्सचं षटक ठरलं टर्निंग पॉईंट, किवींसाठी सेमीफायनलचं समीकरण बदललं
ग्लेन फिलिप्सच्या १८व्या षटकात रेहान अहमदने सुरूवातीला एक षटकार खेचला. यानंतर विल जॅक्सने २ चौकार व एक षटकार लगावत २२ धावा चोपल्या. यासह इंग्लंडला १२ चेंडूत २१ धावांची गरज आहे. रेहान व विल जॅक्सने ७ चेंडूत २७ धावा केल्या आहेत.
ENG vs NZ Live: रचिन रविंद्र स्ट्राईक
रचिन रवींद्रने १७व्या षटकात टॉम बँटनला झेलबाद करत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली.
ENG vs NZ Live: सॅम करन झेलबाद
रचिन रवींद्र १५व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यासह १५ षटकांत संघाने ५ बाद १०१ धावा केल्या आहेत.
NZ vs ENG Live: इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण
इंग्लंडने १४.२ षटकांत १०० धावांचा पल्ला गाठला आहे. यासह आता संघाला ३४ षटकांत ६० धावांची आवश्यकता आहे.
NZ vs ENG Live: ग्लेन फिलिप्सचा अफलातून कॅच
८व्या षटकात रचिन रवींद्रच्या गोलंदाजीवर एक अनपेक्षित झेल टिपला. बेथेलने मोठा फटका खेळला पण सीमारेषेपासून जवळपास बरंच अंतर कापत तो पुढे आला आणि पायाच्या बोटांवर जोर देत पुढे वाकून अफलातून लो कॅच पकडला.
NZ vs ENG Live: फिलिप्सच्या खात्यात मोठी विकेट
ग्लेन फिलिप्स ब्रेकनंतर आठवं षटक टाकण्यासाठी आला आणि पहिल्याच चेंडूवर ब्रूक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. या रन चेसमध्ये इंग्लंडसाठी हा मोठा फटका आहे. ब्रूक २४ चेंडूत २६ धावा करत झेलबाद झाला.
NZ vs ENG Live: पॉवरप्ले
हॅरी ब्रुकने इंग्लंडचा डाव सावरत संघाला पॉवरप्लेमध्ये २ बाद ४७ धावांपर्यंत पोहोचवलं आहे.
NZ vs ENG Live: ब्रुकचा काऊंटर अटॅक
मॅट हेन्रीने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांची झोप उडवली. पण वादळी फॉर्मात असलेल्या हॅरी ब्रुकने मात्र न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजीविरूद्ध आक्रमक फटकेबाजी केली. यासह ४ षटकांत संघाने २ बाद २८ धावा केल्या आहेत.
NZ vs ENG Live: फर्ग्युसनच्या पहिल्याच षटकात विकेट
लॉकी फर्ग्युसन दुसरं षटक टाकण्यासाठी आला आणि दुसऱ्या चेंडूवर त्याने जोस बटलरला माघारी धाडलं. सलग पाचव्या सामन्यात बटलर स्वस्तात बाद झाला आहे.
ENG vs NZ Live: इंग्लंडला पहिला धक्का
मॅट हेन्रीने पहिल्याच षटकात संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे. फिल सॉल्ट विकेटकिपर टीम सेफर्टकरवी झेलबाद झाला. यासह इंग्लंडला पहिल्या षटकात धक्का बसला.
मिचेल सँटनरने रेहान अहमदच्या अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत संघाला १५९ धावांवर पोहोचवलं. सेफर्ट-एलनच्या चांगल्या सुरूवातीनंतर मधल्या षटकांमध्ये इंग्लंडच्या फिरकीपटूंनी किवी संघाच्या धावांना ब्रेक लावला. न्यूझीलंडचे फलंदाज लागोपाठ विकेट्स गमावल्याने धावा होऊ शकल्या नाहीत. पण अखेरीस फायटिंग धावसंख्या उभारत इंग्लंडला विजयासाठी १६० धावांचं आव्हान दिलं आहे.
NZ vs ENG Live: मॅककॉन्ची क्लीन बोल्ड
रेहान अहमदच्या अखेरच्या षटकात मॅककॉन्ची क्लीन बोल्ड झाला. दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचत मॅककॉन्ची झेलबाद झाला.
ENG vs NZ Live: चापमन झेलबाद
चापमन आदिल रशीदच्या गोलंदाजीवर १५ धावा करत झेलबाद झाला आहे. तर डॅरिल मिचेलदेखील ३ धावांवर बाद झाल्याने संघाला मोठा धक्का बसला. तर ग्लेन फिलिप्सल विल जॅक्सने ३९ धावांवर क्लीन बोल्ड केलं. यासह १८ षटकांत न्यूझीलंड संघाने ६ बाद १४२ धावा केल्या आहेत.
ENG vs NZ Live: न्यूझीलंड संघाला तिसरा धक्का
१२वं षटक टाकण्यासाठी रेहान अहमद आला, ज्याचा टी-२० विश्वचषकातील पहिलाच सामना आहे. त्याच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रचिन रवींद्र झेलबाद झाला. यासह १२व्या षटकात न्यूझीलंड संघाने १०० धावांचा पल्ला पार केला आहे.
ENG vs NZ Live: फिन एलन बाद
सेफर्टच्या पाठोपाठ फिन एलनदेखील पुढच्या षटकात माघारी परतला. संघाला चांगली सुरूवात करून दिल्यानंतर विल जॅक्सच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात एलन झेलबाद झाला.
NZ vs ENG live: न्यूझीलंड संघाला पहिला धक्का
आदिल रशीदच्या षटकात षटकार लगावल्यानंतर टीम सेफर्ट स्टंपिंग होत बाद झाला. यासह न्यूझीलंडने पहिली विकेट गमावली आणि ७ षटकांत १ बाद ६७ धावा केल्या आहेत.
NZ vs ENG Live: पॉवरप्ले
न्यूझीलंडने पॉवरप्लेमध्ये शानदार फटकेबाजी करत एकही विकेट न गमावता ५४ धावा कुटल्या आहेत. आर्चरने पहिलं षटक मेडन टाकूनही सेफर्ट व एलनने पुढील षटकांमध्ये धावा भरून काढल्या. सेफर्ट २७ तर एलन २६ धावांवर खेळत आहे.
ENG vs NZ Live: आर्चरची धुलाई
मेडन षटकाने सुरूवात केलेल्या जोफ्रा आर्चरची सेफर्टने धुलाई केली आहे. पाचव्या षटकात सेफर्टने त्याच्या षटकात २ चौकार व एका षटकारासह १६ धावा कुटल्या आहेत.
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली आहे. न्यूझीलंडकडून टीम सेफर्ट व फिन एलनची जोडी उतरली आहे. तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सुरूवात करत पहिलंच मेडन षटक टाकलं आहे.
ENG vs NZ Live: न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन
टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिचेल, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककॉन्ची, मॅट हेन्री, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन
NZ vs ENG Live: इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन
फिल साल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद
टी-२० वर्ल्डकपमधील न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्या सामन्यातील नाणेफेक न्यूझीलंडने जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यासह इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. रेहान अहमद जेमी ओव्हरटनच्या जागी खेळणार आहे.
ENG vs NZ Live: न्यूझीलंड वि. इंग्लंड
टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर-८ सामन्यात आज न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने आहेत. इंग्लंड संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. तर न्यूझीलंडचा संघाने हा सामना जिंकताच सेमीफायनल गाठणार आहे.

England vs New Zealand Highlights ICC T20 World Cup 2026: इंग्लंडने सुपर-8 टप्प्यात अपराजित राहत न्यूझीलंड संघावर रोमांचक विजय मिळवला.
