scorecardresearch

Premium

World Cup, ENG vs NZ: रवींद्र- कॉनवेची वादळी शतके! न्यूझीलंडपुढे माजी विश्वाविजेत्यांनी टेकले गुडघे, इंग्लंडचा नऊ विकेट्सने केला दारूण पराभव

England vs New Zealand, World Cup 2023: विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या गतविजेत्या इंग्लंडचा नऊ गडी राखून दारूण पराभव केला.

World Cup 2023, ENG vs NZ: Rachan Ravindra- Devon Conway's excellent Centuries New Zealand beat England by nine wickets
न्यूझीलंडने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या गतविजेत्या इंग्लंडचा नऊ गडी राखून दारूण पराभव केला. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)

ENG vs NZ Score, ICC Men’s Cricket World Cup 2023: विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या गतविजेत्या इंग्लंडचा नऊ गडी राखून पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी (५ ऑक्टोबर) न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ५० षटकांत नऊ गडी गमावून २८२ धावा केल्या. न्यूझीलंडने ३६.२ षटकात १ विकेट गमावत २८३ धावा करत सामना जिंकला.

न्यूझीलंडचा मोठा विजय

न्यूझीलंड संघाने १३व्या विश्वचषकाची धमाकेदार सुरुवात केली आहे. त्यांनी गतविजेत्या इंग्लंडचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने विश्वचषक २०१९च्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेतला. त्यानंतर विजेतेपदाच्या सामन्यात सामना आणि सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्यानंतर इंग्लंडने चौकार मोजण्याच्या नियमानुसार सामना जिंकला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी (५ ऑक्टोबर) न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ५० षटकांत नऊ गडी गमावून २८२ धावा केल्या. न्यूझीलंडने ३६.२ षटकात १ विकेट गमावत २८३ धावा करत सामना जिंकला.

England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
IND U19 vs AUS U19 ICC
IND vs AUS U19 WC Final : राज लिंबानीचा टिच्चून मारा, हरजस सिंगचं अर्धशतक, ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर २५४ धावांचं आव्हान
IND vs ENG : टीम इंडियाचा ‘प्रिन्स’ फॉर्ममध्ये आला, शुबमन गिलने ११ महिन्यांनंतर झळकावले शतक
Ravindra Jadeja Injury Updates
IND vs ENG : टीम इंडियाला आणखी एक धक्का, स्टार अष्टपैलू खेळाडू दुसऱ्या कसोटीला मुकणार?

रचिन आणि कॉनवे यांनी २७३ धावांची नाबाद भागीदारी केली

न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रचिन रवींद्र यांनी कमाल केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २७३ धावांची नाबाद भागीदारी केली. कॉनवेने १२१ चेंडूत नाबाद १५२ धावा केल्या. रचिनने ९६ चेंडूत १२३ धावा केल्या. कॉनवेने आपल्या खेळीत १९ चौकार आणि तीन षटकार मारले. तर रचिनने ११ चौकार आणि पाच षटकार मारले. दोघांच्या आक्रमक फलंदाजीसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल दिसत होते. इंग्लंडकडून फक्त सॅम करनने एक विकेट घेतली. रचिनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक धावा केल्या

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने ५० षटकांत नऊ गडी गमावून २८२ धावा केल्या. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने सर्वाधिक ७७ धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला ५० धावांचा टप्पा गाठता आला नाही. कर्णधार जोस बटलरने ४३ धावा केल्या. जॉनी बेअरस्टोने ३३, हॅरी ब्रूकने २५ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने २० धावांचे योगदान दिले. आदिल रशीदने नाबाद १५, डेव्हिड मलान आणि सॅम करनने १४-१४, मार्क वुडने नाबाद १३, मोईन अली आणि ख्रिस वोक्सने ११-११ धावा केल्या.

हेही वाचा: World Cup 2023: टीम इंडिया २०११च्या वर्ल्डकप इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? नव्या सरावाची जर्सी पाहून चाहत्यांनी केल्या मजेशीर कमेंट्स

मॅट हेन्रीने तीन विकेट्स घेतल्या

या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या स्फोटक फलंदाजांना मुक्तपणे खेळू दिले नाही. वेगवान आणि फिरकीच्या मिश्रणाने इंग्लिश संघाला खूप त्रास दिला. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. फिरकीपटू मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. ट्रेंट बोल्ट आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eng vs nz new zealand beats england by nine wickets avenges the defeat in the 2019 world cup final avw

First published on: 05-10-2023 at 21:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×