ENG vs WI: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील १५ वा सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजकडून रूदरफोर्डने शेवटपर्यंत टिकून राहून दमदार फलंदाजी केली. त्याने नाबाद ७६ धावा केल्या. तर जेसन होल्डरने ३३ धावा करत संघाची धावसंख्या २० षटकांअखेर ६ गडी बाद १९६ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव १६६ धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजने हा सामना ३० धावांनी आपल्या नावावर केला.

Live Updates

[caption id="attachment_5457018" align="alignnone" width="670"]west indies cricket team west indies cricket team (फोटो-ICC)[/caption]

England vs West Indies Highlights: पाहा इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडिज सामन्याचे हायलाईट्स.

22:28 (IST) 11 Feb 2026

ENG vs WI Live: इंग्लंडची पराभवाच्या दिशेने वाटचाल

इंग्लंडचा आठवा फलंदाज बाद होऊन माघारी परतला आहे. जोफ्रा आर्चर धावबाद झाला आहे.

22:13 (IST) 11 Feb 2026

ENG vs WI Live: इंग्लंडला सहावा धक्का! विल जॅक्स परतला माघारी

विल जॅक्स अवघ्या २ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.

22:04 (IST) 11 Feb 2026

ENG vs WI Live: गुडाकेश मोटीचा भन्नाट कॅच! ब्रूक स्वस्तात परतला माघारी

गुडाकेश मोटीच्या भन्नाट कॅचमुळे हॅरी ब्रूकचा डाव अवघ्या १७ धावांवर माघारी परतला आहे.

21:45 (IST) 11 Feb 2026

ENG vs WI Live: काय बॉल टाकलाय! गुडाकेश मोटीच्या भन्नाट बॉलवर बेथलची दांडी गुल

गुडाकेश मोटीच्या भन्नाट बॉलवर बेथल ३३ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.

21:37 (IST) 11 Feb 2026

ENG vs WI Live: इंग्लंडचे टॉप ३ फलंदाज तंबूत! टॉम बँटन स्वस्तात परतला माघारी

इंग्लंडला तिसरा मोठा धक्का बसला आहे. जोस बटलर बाद झाल्यानंतर टॉपम बँटन अवघ्या २ धावा करून माघारी परतला आहे.

21:30 (IST) 11 Feb 2026

ENG vs WI Live: इंग्लंडला सर्वात मोठा धक्का! जोस बटलर परतला माघारी

इंग्लंडला चांगली सुरूवात मिळाली होती. पण जोस बटलर २१ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला आहे.

21:07 (IST) 11 Feb 2026

ENG vs WI Live: अकेल हुसेनचा शिस्तबद्ध मारा

अकेल हुसेनने शिस्तबद्ध मारा करत फिल सॉल्ट आणि जोस बटलरचं आक्रमण रोखलं.

21:03 (IST) 11 Feb 2026

ENG vs WI Live: होल्डरच्या षटकात सॉल्टने चोपल्या २४ धावा

जेसन होल्डरच्या पहिल्या षटकात फिल सॉल्टने चौकार, षटकारांची लयलूट करत २४ धावा चोपून काढल्या.

20:59 (IST) 11 Feb 2026

सॉल्ट-बटलरची आक्रमक सुरुवात

फिल सॉल्ट आणि जोस बटलर यांनी मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली आहे.

20:51 (IST) 11 Feb 2026

ENG vs WI Live: रुदरफोर्ड-होल्डरची तुफान फटकेबाजी! वेस्ट इंडिजने इंग्लंडसमोर विजयासाठी ठेवलं इतक्या धावांचं आव्हान

इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १९७ धावांची गरज आहे.

20:20 (IST) 11 Feb 2026

ENG vs WI Live: रुदरफोर्डचं अर्धशतक

वेस्ट इंडिडजचा स्फोटक फलंदाज रुदरफोर्डने २९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

20:16 (IST) 11 Feb 2026

WI vs ENG Live: वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत! पॉवेल परतला माघारी

वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. पॉवेल १४ धावा करून माघारी परतला आहे. वेस्ट इंडिजने १४.२ षटकात ५ गडी बाद १२८ धावा केल्या आहेत.

19:53 (IST) 11 Feb 2026

ENG vs WI Live: आदिल रशीदच्या भन्नाट बॉलवर अशी पडली चेजची विकेट

रोस्टन चेजने वेस्ट इंडिजचा डाव सांभाळला होता. पण आदिल रशीदच्या फिरकीसमोर त्याने गुडघे टेकले. त्याला ३३ धावांवर LBW बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

19:36 (IST) 11 Feb 2026

ENG vs WI Live; वेस्ट इंडिजचे टॉप ३ फलंदाज परतले तंबूत!

सुरूवातीला २ मोठे धक्के बसल्यानंतर शिमरोन हेटमायरने मोठे फटके मारले.पण तो २३ धावा करून माघारी परतला आहे.

19:10 (IST) 11 Feb 2026

ENG vs WI Live: वेस्ट इंडिजला लागोपाठ दुसरा धक्का! होपनंतर ब्रेंडन किंग परतला माघारी

वेस्ट इंडिजला लागोपाठ दुसरा धक्का बसला आहे. होपनंतर ब्रेंडन किंग अवघ्या ३ धावा करून माघारी परतला आहे.

19:08 (IST) 11 Feb 2026

ENG vs WI Live Score: वेस्ट इंडिजला पहिल्याच षटकात मोठा धक्का! शे होप शून्यावर परतला माघारी

याा सामन्यातील पहिल्या षटकात वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. शे होप शून्यावर माघारी परतला आहे.

England vs West Indies: इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडिज सामन्याचे हायलाईट्स.