India vs England 2nd Test: बर्मिंघमच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ५८७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला अपेक्षेप्रमाणे सुरुवात करता आली नाही. सुरुवातीलाच ३ मोठे धक्के बसल्यानंतर पहिल्या दिवसातील शेवटच्या षटकात हॅरी ब्रुक थोडक्यात बचावला. त्याने हटके पद्धतीने आपली विकेट वाचवली. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ५८७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांनी स्वस्तात पॅव्हेलियनची वाट धरली. त्यामुळे हॅरी ब्रुकवर मोठी जबाबदारी होती. त्यावेळी २० वे षटक टाकण्यासाठी भारताकडून प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजीला आला. या षटकातील एक चेंडू वेगाने आत आला. त्यावेळी चेंडू हॅरी ब्रुकच्या बॅटचा कडा घेऊन यष्टीवर आदळणार होता. इतक्यात ब्रुकने चेंडू अडवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. त्याने बॅटने नव्हे तर, खांद्याचा वापर करून चेंडू अडवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इंग्लंडचे ५ फलंदाज तंबूत

भारतीय संघाने दिलेल्या ५८७ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला सुरूवातीला मोठे धक्के बसले आहेत. पहिल्या दिवशी आकाश दीपने इंग्लंडला लागोपाठ दोन धक्के दिले. ओली पोप आणि बेन डकेट शून्यावर माघारी परतले. तर मोहम्मद सिराजने जॅक क्रॉलीला बाद करत माघारी धाडलं. दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजने इंग्लंडला २ मोठे धक्के दिले. त्याने जो रूट आणि बेन स्टोक्सला बाद केलं. दुसऱ्या दिवशी फलंदाजी करतान हॅरी ब्रुकने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

भारतीय संघाने उभारला ५८७ धावांचा डोंगर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना शुबमन गिलने सर्वाधिक २६९ धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजाने ८९ आणि यशस्वी जैस्वालने ८७ धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांचं शतक अवघ्या काही धावांनी हुकलं. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ५८७ धावांचा डोंगर उभारला.