कतारचे यजमानपद असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ हंगामात रविवारी रात्री उशिरा प्री-क्वार्टर फायनलचा चौथा सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंड संघाने शानदार खेळाचे प्रदर्शन करत सेनेगलचा ३-० असा दारुन पराभव केला. यासह, इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीसाठीही पात्रता मिळवली आहे, जिथे त्यांचा सामना गतविजेत्या फ्रान्सशी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी केन, जॉर्डन हेंडरसन, बुकायो साका हे या सामन्याचे नायक ठरले, ज्यांनी आपल्या संघाला इंग्लंडला सुपर-८ मध्ये पोहोचवण्यासाठी प्रत्येकी एक असे शानदार गोल केले. इंग्लिश संघ विश्वचषकाच्या इतिहासात १०व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. इंग्लंडने गेल्या वेळीही सुपर-८फेरी गाठली होती. त्याचबरोबर सेनेगलने २००२ मध्ये फक्त एकदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

असे केले गेले गोल –

पहिला गोल: जॉर्डन हेंडरसनने ३८व्या मिनिटाला ज्युड बेलिंगहॅमच्या पासवर गोल केला.
दुसरा गोल: ४५+३ हॅरी केनने फिल फोडेनच्या पासवर गोल केला.
तिसरा गोल: बुकायो साकाने ५७व्या मिनिटाला फिल फोडेनच्या पासवर गोल केला.

हेही वाचा – एम्बापेच्या गोलधडाक्यामुळे पोलंडवर मात

फोडेनने इंग्लंडसाठी लागोपाठ दोन गोल करण्यात केली मदत –

नक्की वाचा >> विश्लेषण: मेसी, रोनाल्डोचे विक्रम मोडेल अशी क्षमता फ्रान्सच्या किलियन एम्बापेमध्ये आहे का?

या सामन्यात इंग्लंड संघाने सुरुवातीपासूनच सेनेगलवर आपले वर्चस्व कायम ठेवले होते. सुरुवातीच्या २० मिनिटांच्या खेळात इंग्लंडने एक आणि सेनेगलने दोनदा गोल करण्याचा प्रयत्न केला. पण सामन्यातील पहिला गोल ३८व्या मिनिटाला झाला. हा गोल जॉर्डन हेंडरसनने केला, त्याला ज्युड बेलिंगहॅमने साथ दिली. यानंतर, पहिला हाफ संपण्यापूर्वी म्हणजेच ४५+३व्या मिनिटाला फिल फोडेनच्या मदतीने इंग्लिश कर्णधार हॅरी केनने दुसरा गोल केला.

हेही वाचा – अर्जेटिना, फ्रान्स उपांत्यपूर्व फेरीत; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयात मेसीची चमक

सामन्याच्या उत्तरार्धातही इंग्लंड संघाने आपला दबदबा आणि आक्रमक खेळ कायम राखला. संघाने ५७ व्या मिनिटालाच तिसरा गोल केला. हा गोल स्टार खेळाडू बुकायो साका याने केला. फिल फोडेनने हा सलग दुसरा गोल करण्यास मदत केली. अशाप्रकारे इंग्लंड संघाने हा सामना ३-० अशा फरकाने जिंकला. तर सेनेगल संघाला संपूर्ण सामन्यात एकही गोल करता आला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England beat senegal three zero in the fifa world cup 2022 pre quarter final match vbm
First published on: 05-12-2022 at 08:53 IST