England Squad For 1st Test, India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २० जूनपासून खेळवला जाईल. या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्राडन कार्स, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ओली पोप,जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.
हेडिंग्लेमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी स्टार अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हरटनला संघात स्थान देण्यात आलं आहे. हा खेळाडू ३ वर्षांनंतर संघात कमबॅक करणार आहे. त्याने २०२२ न्यझीलंडविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच त्याची इंग्लंडच्या कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.
यासह वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स,ख्रिस वोक्सला देखील या संघात स्थान देण्याता आलं आहे. हे दोघेही डिसेंबरमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत शेवटचा कसोटी सामना खेळताना दिसून आले होते.
असं आहे या मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: २० ते २४ जून – हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी: २ ते ६ जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी: १० ते १४ जुलै – लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी: २३ ते २७ जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट – द ओव्हल, लंडन
भारतीय संघाचा कर्णधार बदलला
इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या मालिकेआधी भारतीय संघात मोठे बदल झाले आहेत. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यासह विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या जागी युवा फलंदाज शुबमन गिलची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर साई सुदर्शन आणि करूण नायर यांना संघात स्थान देण्यात आलं आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ:
शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव</p>