England Football Team Practicing Cricket Ahead Of FIFA World Cup: येत्या काही दिवसात जगभरात फिफा वर्ल्डकप स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. फुटबॉल चाहते गेल्या ४ वर्षांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण अखेर आला आहे. फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला येत्या ११ जूनपासून सुरुवात होणार आहे. तर या स्पर्धेतील अंतिम सामना ११ जुलैला खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिकेत केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ दाखल झाले आहेत. दरम्यान इंग्लंडचा संघ देखील अमेरिकेत दाखल झाला आहे. दरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंचा सराव करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इंग्लंडचा क्रिकेटचा संघ वर्ल्डकपविजेत्या संघांपैकी एक आहे. २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने घरच्या मैदानावर खेळताना वनडे वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. आता इंग्लंडचा फुटबॉलचा संघ फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे. क्रिकेट आणि फुटबॉल हे दोन्ही खेळ वेगळे असले, तरीदेखील खेळाडूंना फुटबॉल चांगलं जमतं. तुम्ही अकेकदा पाहिलं असेल की, क्रिकेटचा सामना सुरु होण्याआधी क्रिकेटपटू मैदानावर सरावाचा भाग म्हणून फुटबॉल खेळताना दिसून येतात. कारण फुटबॉल खेळल्याने शरीरीचा व्यायाम होतो. पण इथे उलट चित्र पाहायला मिळालं आहे. सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत, ज्यात इंग्लंडचे फुटबॉलपटू सराव म्हणून क्रिकेट खेळताना दिसून येत आहेत.
इंग्लंडला १९६६ नंतर एकदाही फिफा वर्ल्डकप जेतेपदाची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. त्यामुळे यावेळी इंग्लंडचा संघ जेतेपदासाठी पूर्ण जोर लावताना दिसून येणार आहे. इंग्लंडचा संघ १७ जूनला डॅलस येथे क्रोएशियाविरूद्ध होणाऱ्या सामन्याने सुरुवात करणार आहे.या स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ एल गटात समावेश करण्यात आला आहे. या सामन्याआधी इंग्लंडचे खेळाडू सराव करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान इंग्लंड फुटबॉल संघाच्या एक्स अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात इंग्लंडचे खेळाडू सरावाचा भाग म्हणून क्रिकेट खेळताना दिसून येत आहेत. या फोटोमध्ये हॅरी केन फलंदाजी करताना दिसून येत आहे. तर आणखी एक पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, बायर्न म्युनिच लेग स्पिन गोलंदाजी करताना दिसून येत आहे.
फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ:
गोलरक्षक: डीन हेंडरसन, जेम्स ट्रॅफर्ड,जॉर्डन पिकफोर्ड.
बचावपटू: टिनो लिव्हरामेंटो , निको ओ’रायली, डॅन बर्न ,मार्क गुएही, रीस जेम्स , एझरी कोन्सा, जॅरेल क्वानसा , जेड स्पेन्स , जॉन स्टोन्स.
मध्यरक्षक: इलियट अँडरसन,जॉर्डन हेंडरसन, कोबी मैनू , डेक्लन राइस , मॉर्गन रॉजर्स, ज्यूड बेलिंगहॅम, एबेरेची एझे.
आघाडीचे खेळाडू: अँथनी गॉर्डन, मार्कस रॅशफोर्ड, बुकायो साका, इव्हान टोनी, ओली वॅटकिन्स, हॅरी केन, नोनी माडुएके.
