वर्ल्डकपविजेत्या खेळाडूला वर्षभर खेळता येणार नाही क्रिकेट; आयपीएल, वर्ल्डकप, अ‍ॅशेसला मुकणार

‘प्रमुख’ खेळाडू बाहेर गेल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाला सतावतेय चिंता

England pacer jofra archer ruled out of ipl, t20 world cup and ashes
इंग्लंडचा संघ

भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळणाऱ्या इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे कसोटी मालिका, यंदाचा टी-२० विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. एवढेच नव्हे, तर आर्चर अॅशेस मालिकेतही खेळू शकणार नाही. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्रातही आर्चर खेळणार नाही. जोफ्रा आर्चरच्या उजव्या हाताच्या कोपराची दुखापत पुन्हा एकदा समोर आली आहे आणि यामुळे तो यापुढे संपूर्ण वर्ष गोलंदाजी करू शकणार नाही. जोफ्रा आर्चर इंग्लंडच्या मुख्य गोलंदाजांपैकी एक आहे आणि दुखापतीमुळे त्याचे संघान नसणे, हा इंग्लिश संघाला मोठा धक्का आहे.

गेल्या आठवड्यात आर्चरच्या उजव्या कोपराचे स्कॅन झाले. स्कॅनमध्ये असे दिसून आले, की त्याची आधीच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले आहे. वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी जोफ्रा आर्चरची ही दुखापत खूप चिंतेची बाब आहे. दुखापतीमुळे आर्चर जास्त काळ मैदानाबाहेरच दिसून आला आहे.

 

 

आर्चरची दुखापत समोर आल्यापासून तो केवळ ६ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ११ टी-२० सामने खेळू शकला आहे. आर्चर अजून युवा असून तो पुनरागमन करू शकतो, पण अॅशेस स्पर्धेत आर्चर नसणे हा इंग्लंडसाठी मोठा धक्का आहे. इंग्लंडने जोफ्रा आर्चर, मार्क वुड आणि ऑली स्टोन या गोलंदाजांचा विचार करून अॅशेस जिंकण्याची योजना आखली होती.

 

हेही वाचा – उपराष्ट्रपतींनंतर आता धोनीच्या नावासमोरील Blue Tick ट्विटरनं हटवली!

२०१९च्या विश्वचषकादरम्यान, आर्चर इंग्लंडसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. अंतिम सामन्यात त्याने सुपर ओव्हरमध्ये दमदार गोलंदाजी करत इंग्लंडला विश्वविजेतेपद मिळवून दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: England pacer jofra archer ruled out of ipl t20 world cup and ashes adn

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या