ENG vs IND : चौथ्या कसोटीपूर्वी ‘वर्ल्डकपविजेत्या’ खेळाडूचा मोठा निर्णय; ‘या’ कारणामुळे होता निराश

२०१९च्या विश्वचषक फायनलमध्ये तो न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता, हाच त्याचा देशासाठीचा शेवटचा सामना ठरला.

england pacer liam plunkett signs three year deal with usas major league cricket
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान लियाम प्लंकेटने अमेरिकेत जाऊन खेळण्याचा निर्णय घेतला आहे,

इंग्लंड क्रिकेट संघाचा विश्वचषक विजेता खेळाडू लियाम प्लंकेटने अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटशी तीन वर्षांचा करार केला आहे. २०१९च्या विश्वचषकानंतर प्लंकेटला संघातून वगळण्यात आले होते. यानंतर, त्याने काउंटी क्रिकेट खेळणे सुरू ठेवले आणि अलीकडेच द हंड्रेड स्पर्धेमध्ये भाग घेतला. तो पुढच्या वर्षी मेजर लीग क्रिकेटमधील फार्म लीग मायनर लीग क्रिकेटमध्ये भाग घेईल. तो फिलाडेल्फियन्स संघाकडून खेळेल.

३६ वर्षीय प्लंकेटचे लग्न फिलाडेल्फियाच्या मेट्रो परिसरात राहणाऱ्या अमेरिकन मुलीशी झाले आहे. यामुळेच त्याने फिलाडेल्फियन्स संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, एक वरिष्ठ खेळाडू असल्याने संघात मार्गदर्शकाची भूमिकाही बजावेन आणि अनेक अकादमींना प्रशिक्षणही देईन, असे त्याने सांगितले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Liam Plunkett (@pudsy190)

प्लंकेट म्हणाला, ”मेजर लीग क्रिकेटमध्ये सामील होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे आणि अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करेन. माझी इंग्लंडमध्ये एक अद्भुत कारकीर्द आहे. निवृत्त झाल्यानंतर मी अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन देईन. खेळण्याव्यतिरिक्त मी कोचिंगही करेन.”

हेही वाचा – ENG vs IND 4th Test : इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज, इंग्लंडनं जिंकली नाणेफेक

लियाम प्लंकेटने २००५मध्ये पदार्पण केले, परंतु सुरुवातीच्या काळात त्याला त्याच्या कामगिरीसाठी जास्त संधी मिळाल्या नाहीत. प्लंकेट २०१९च्या विश्वचषक फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता, जो इंग्लंडसाठी त्याचा शेवटचा सामना होता. वेगवान गोलंदाजाने निर्णायक सामन्यात चमकदार कामगिरी करत ४२ धावांत ३ विकेट्स घेतल्या, ज्यात केन विल्यमसनच्या महत्त्वपूर्ण विकेटचा समावेश होता.

२०१९च्या विश्वचषकात प्रभावी कामगिरी असूनही प्लंकेट संघाबाहेर पडला आहे, या कारणामुळे तो निराश झाला आहे, मात्र विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असल्याने तो खूश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: England pacer liam plunkett signs three year deal with usas major league cricket adn