IPL 2022 : इंग्लंडचा जो रूट लीगमध्ये खेळणार? मेगा ऑक्शनमध्ये उतरणार असल्याचे दिले संकेत!

रूट हा आजच्या युगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो.

England Test Captain Joe Root reaction about IPL 2022 Auction
जो रूट

चार वर्षांपूर्वी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लिलावात कोणत्याही संघात संधी न मिळाल्यानंतर इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने यंदा पुन्हा लिलावात प्रवेश करण्याचा विचार केला आहे. २०१८ मधील आयपीएल लिलावात, कोणत्याही संघाने रूटसाठी बोली लावली नाही. रूट हा आजच्या युगातील महान खेळांडूंपैकी एक मानला जातो.

कसोटी कारकिर्दीवर परिणाम होणार नसेल, तर या लीगमध्ये खेळायला आवडेल, असे ३१ वर्षीय रूटने सांगितले आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोला रूटने सांगितले, “वेळ कमी आहे पण माझ्याकडे विचार करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. माझ्या कसोटी क्रिकेट खेळण्यावर याचा नकारात्मक परिणाम होईल का? जर मला तसे वाटत नसेल, तर मी स्वतःला लिलावात उतरवेन. पण इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळणे कठीण होईल, असे मी कधीही करणार नाही. याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ती माझी आणि इतर खेळाडूंची प्राथमिकता आहे.”

हेही वाचा – नागपूरच्या पोट्टीचा पराक्रम; २० वर्षीय तरुणीनं ऑलिम्पिक पदकविजेत्या सायनाला केलं पराभूत!

रूटने गेल्या वर्षी कसोटीत सर्वाधिक १७०८ धावा केल्या होत्या. त्याने ६ शतकेही झळकावली. आगामी आयपीएल हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही आयपीएलमध्ये परतण्याचा विचार करत आहे. स्टार्कने शेवटची आयपीएल स्पर्धा २०१५ मध्ये खेळली.

स्टार्कला २०१८ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने ९.४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण केकेआरला त्याला सोडावे लागले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: England test captain joe root reaction about ipl 2022 auction adn

Next Story
नागपूरच्या कन्येचा पराक्रम; २० वर्षीय तरुणीनं ऑलिम्पिक पदकविजेत्या सायनाला केलं पराभूत!
फोटो गॅलरी