Ashes Series 2026 Full Schedule: अॅशेस मालिका ही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये होणारी सर्वात प्रतिष्ठित मालिका आहे. या मालिकेला १४४ वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे ही मालिका दोन्ही संघांसाठी वर्ल्डकप जिंकण्यापेक्षा कमी नसते. दोन्ही संघातील क्रिकेट चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान ही मालिका केव्हा सुरु होणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या होम सिझनच्या मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यादरम्यान अॅशेस २०२६ स्पर्धेच्या वेळापत्रकाचीही घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान ही मालिका केव्हा सुरु होणार? जाणून घ्या.

येत्या २०२७ मध्ये इंग्लंडचं वेळापत्रक व्यग्र असणार आहे. या वर्षांत इंग्लंडचा सामना बांगलादेश, न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. यासह अॅशेस मालिकेचा थरारही रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अॅशेस मालिकेची सुरुवात ही १८ जूनपासून होणार आहे. मालिकेतील पहिला सामना नॉटिंगहॅमच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना २९ जुलैपासून लंडनमधील द ओव्हलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

अॅशेस मालिकेतील पहिला सामना १८ जून ते २२ जूनदरम्यान नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना ३० जून ते ४ जुलैदरम्यान लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील तिसरा सामना ८ जुलै ते १२ जुलैदरम्यान बर्मिंघमच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील चौथा कसोटी सामना २१ ते २५ जुलैदरम्यान साउथॅम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील शेवटचा कसोटी सामना २९ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान लंडनमधील द ओव्हलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

असं आहे या मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

पहिला कसोटी सामना- १८ जून ते २२ जून, २०२७ – ट्रेंट ब्रिज,नॉटिंगहॅम
दुसरा कसोटी सामना- ३० जून ते ३ जुलै, २०२७, लॉर्ड्स
तिसरा कसोटी सामना- ८ जुलै ते १२ जुलै, २०२७, बर्मिंघम
चौथा कसोटी सामना- २१ जुलै ते २५ जूलै, २०२७, साउथॅम्पटन
पाचवा कसोटी सामना- २९ जुलै ते २ ऑगस्ट, २०२७, द ओव्हल