England vs Pakistan Live Streaming Details: पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळवला जाणार आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा करायचा असेल, तर ही मालिका जिंकणं अतिशय गरजेचं असणार आहे. दरम्यान ही मालिका भारतात कुठे आणि किती वाजता पाहता येणार? जाणून घ्या.
दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची मालिका
इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणारी कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणार आहे. इंग्लंडचा संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. तर पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. त्यामुळे तळाशी असलेल दोन्ही संघ ही मालिका जिंकून गुणतालिकेत वर जाण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याच्या जागी जो रुटची पुन्हा एकदा कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर पाकिस्तानच्या ताफ्यातही मोठा बदल करण्यात आला आहे. बाबर आझमची पुन्हा एकदा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. पण बाबर आझम दुखापतग्रस्त असल्यामुळे तो पहिला कसोटी सामना खेळताना दिसून येणार नाही.
भारतात लाईव्ह कुठे पाहता येणार?
इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणारी कसोटी मालिका तुम्ही भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. हा सामना तुम्ही सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे. तर भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी ३:३० वाजता सुरु होईल. हे सामने तुम्ही सोनी लिव्ह अॅपवरही लाईव्ह पाहू शकता.
इंग्लंड- पाकिस्तान सामन्याचं संपूर्ण वेळापत्रक
पहिला कसोटी सामना- १९ ते २३ ऑगस्ट- हेडिंग्ले, लीड्स
दुसरा कसोटी सामना – २७ ते ३१ ऑगस्ट- लॉर्ड्स, लंडन
तिसरा कसोटी सामना- ९ ते १३ सप्टेंबर- एजबस्टन, बर्मिंघम
