Video: इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात झेल घेण्यावरून सरफराज अहमद आणि शदाब खान यांच्यात वाद

लेवीस ग्रेगरीने हरीस रौफच्या गोलंदाजीवर उंच फटका मारला. झेल घेताना शदाब खान आणि सरफराज अहमद यांच्यात शाब्दिक वाद झाला.

England-Vs-Pakistan
Video: इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात झेल घेण्यावरून सरफराज अहमद आणि शदाब खान यांच्यात वाद (Photo- AP)

इंग्लंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला ३ गडी आणि १२ चेंडू राखून पराभूत केलं. इंग्लंडने मालिका ३-० ने जिंकत पाकिस्तानला क्लीन स्वीप दिला. पाकिस्ताननं ५० षटकात ३३१ धावांचा डोंगर रचत इंग्लंडसमोर ३३२ धावांचं आव्हान दिलं होतं. या सामन्यात जेम्स विन्सने ९५ चेंडूत १०२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर तळाच्या लेवीस ग्रेगरीने आक्रमक खेळी करत संघाचा विजय सोपा केला. त्याने ६९ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. त्यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमीची दीड शतकी खेळी वाया गेली.

लेवीस ग्रेगरीने ६९ चेंडूत ७७ धावांची महत्त्वपूर्ण केली. हरीस रौफच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात शदाब खाननं त्याचा झेल घेतला आणि त्याला तंबूत धाडलं. मात्र हा झेल घेताना शदाब खान आणि सरफराज अहमद यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा झेल कोण घेणार? यावरून इशाऱ्यावरून तू तू मै मै झाली. मात्र अखेर शदाबने झेल घेतला. हा झेल घेतल्यानंतर शदाबने रागाच्या नजरेनं सरफराजकडे पाहीलं. त्यात सरफारजही काहीतरी बडबड करून निघून गेला. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

“हा झेल घेण्यासाठी सरफराज अहमद याला बिलकूल इच्छा नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे शदाब खानला झेल घ्यावा लागला. हा झेल खऱं तर यष्टीरक्षकाने घ्यायला हवा होता.” असं श्रीलंकेचे माजी यष्टीरक्षक कुमार संगकारा यांने सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: England vs pakistan mid match moment of anger between sarfaraz ahmed and hadab khan rmt

फोटो गॅलरी