इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल : लिव्हरपूलकडून युनायटेडचा धुव्वा

लिव्हरपूलने नऊ सामन्यांत सहाव्या विजयासह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले.

मोहम्मद सलाह

मँचेस्टर : मोहम्मद सलाहने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर लिव्हरपूलने प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडचा ५-० असा धुव्वा उडवला.

‘युनायटेडला मार्गदर्शन करताना माझ्या कारकीर्दीतील सर्वात वाईट क्षण,’ अशा शब्दांत प्रशिक्षक ऑली गनर सोल्स्कार यांनी या पराभवाचे वर्णन केले. लिव्हरपूलने मध्यंतरालाच ४-० अशी मोठी आघाडी घेतली आणि उत्तरार्धात आणखी एका गोलची भर घातली. त्यांच्याकडून सलाहने (३८, ४५+५, ५०वे मिनिट) तीन, तर नाबी केटा (५वे मि.) आणि दिओगो जोटा (१३वे मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. लिव्हरपूलने नऊ सामन्यांत सहाव्या विजयासह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले.

रेयालची बार्सिलोनावर मात

बार्सिलोना : डेव्हिड अलाबा आणि लुकास वास्केज यांच्या गोलमुळे रेयाल माद्रिदने ला लिगा फुटबॉलमध्ये बार्सिलोनाला २-१ असे पराभूत केले. ३२व्या मिनिटाला अलाबाने गोल करत रेयालला १-० अशी आघाडी मिळवून दिली. भरपाई वेळेत वास्केजने रेयालची आघाडी दुप्पट केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: English premier league football liverpool beat manchester united zws

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या