टोक्यो ऑलिम्पिकमध्ये घोडेस्वारीत भारतीय घोडेस्वार फवाद मिर्झाने चमकदार कामगिरी केली आहे. मिर्झा ४७.२० च्या मजबूत स्कोअरसह वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठून त्याने विशेष यश मिळवले त्यामुळे त्याची आता पदकासाठी स्पर्धा असणार आहे. फवाद मिर्झा हा २० वर्षांतील पहिला घोडेस्वार आहे जो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा फवाद हा तिसरा भारतीय घोडेस्वार आहे. त्याच्या आधी इंद्रजीत लांबा (१९९६ अटलांटा) आणि इम्तियाज अनीस (२००० सिडनी) यांनीही ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.




#TokyoOlympics: Equestrian Fouaad Mirza and Seigneur Medicott qualify for the Jumping Individual Finals pic.twitter.com/l4LgQvptH5
— ANI (@ANI) August 2, 2021
फवाद मिर्झाची पदक जिंकण्याची शक्यता कमी दिसत आहे मात्र, ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठून त्याने विशेष यश मिळवले.