बर्लिन : युरोपात आपल्या खेळाचा दबदबा राखणाऱ्या क्रोएशिया आणि स्पेन या दोन संघांत यंदाच्या युरो स्पर्धेतील पहिली लढत होईल तेव्हा अनुभवाला तरुणाईचे आव्हान राहणार आहे. जर्मनीच्या राजधानीत युरो स्पर्धेतील पहिलाच सामना हेणार असून, येथेच शेवटी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

लुका मॉड्रिचच्या नेतृत्वाखाली झ्लात्को डॅलिच यांनी क्रोएशिया संघात पुन्हा एकदा अनुभवाला संधी दिली आहे, तर स्पेनने या वेळेस युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. दोन्ही संघ यापूर्वीच्या अखेरच्या चार स्पर्धेत एकमेकांसमोर आले असून, अखेरच्या २०२० मध्ये स्पर्धेत बाद फेरीत स्पेनने अतिरिक्त वेळेत क्रोएशियाला ५-३ असे पराभूत केले होते. क्रोएशियाचा कर्णधार मॉड्रिच ३८ वर्षांचा असून, तो पाचव्यांदा या स्पर्धेत खेळत आहे. या वेळी त्याला स्पॅनिश लीग आणि चॅम्पियन्स लीगच्या विजेतेपदाची जोड आहे.

spain euro 2024 african player
विश्लेषण: यमाल, विल्यम्स, मुसियाला, साका… युरो फुटबॉल स्पर्धेवर आफ्रिकन प्रभाव! स्पेनला कसा झाला फायदा?
uruguay take third place at copa america beats canada
उरुग्वे संघाला तिसरे स्थान; कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत कॅनडावर शूटआऊट मध्ये ४-३ ने विजय
copa america 2024 final argentina vs colombia match prediction
Copa America 2024 : तिहेरी मुकुटाची अर्जेंटिनाला संधी; कोपा अमेरिकाच्या अंतिम लढतीत कोलंबियाचे आव्हान
spain vs france semi final match preview
युरो अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज; आक्रमक स्पेनची फ्रान्सशी गाठफुटबॉल महासत्तांत वर्चस्वाची लढत
Copa America football tournament Brazil challenge ends
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा: ब्राझीलचे आव्हान संपुष्टात
argentina beat ecuador in copa america
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : मार्टिनेझमुळे अर्जेंटिनाचे आव्हान शाबूत; इक्वेडोरला पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवत उपांत्य फेरीत
Portugal beat Slovenia on penalties sport news
पेनल्टीच्या नाट्यात पोर्तुगालचा विजय; स्लोव्हेनियावर ३-० ने मात करत उपांत्यपूर्व फेरीत
England beat Slovakia to reach the quarter-finals of the Euro Football Championship sport news
अलौकिक बेलिंगहॅमने इंग्लंडला तारले! स्लोव्हाकियाला नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

हेही वाचा >>> USA VS IRE T20 World Cup: पाकिस्तान ट्वेन्टी२० वर्ल्डकपमधून माघारी; अमेरिकेचं सुपर८चं स्वप्न साकार

स्पेनचा आधारस्तंभ असणारा मध्यरक्षक डॅनी ओल्मोला क्रोएशियन खेळाडूंबरोबर खेळण्याचा सराव असल्यामुळे क्रोएशिया आपले नियोजन तसे राखूनच करेल असे मानले जाते. स्पेन संघात १६ वर्षीय लॅमिने यामल आणि २१ वर्षीय निको विल्यम्स या युवा खेळाडूंचा समावेश असून, त्यांच्याकडून स्पेनला नक्कीच अपेक्षा राहतील यात शंका नाही. स्पेन प्रशिक्षक लुईस डेला फुएन्टे यांनी या स्पर्धेसाठी युवा पाऊ क्युबार्सी आणि मार्कोस लोरेन्टो यांना वगळून सर्वांना धक्का दिला होता. या दोघांच्या जागी अयोज पेरेझ आणि फेर्मिन लोपेझ यांच्यावर त्यांनी विश्वास दाखवला आहे. क्रोएशियाच्या तुलनेत स्पेनला युरो स्पर्धेत खेळण्याचा अनुभव अधिक आहे. स्पेन १२व्यांदा स्पर्धेत खेळत असून, क्रोएशिया एकूण सातव्यांदा तर सलग सहाव्यांदा खेळत आहे.

● वेळ : रात्री ९.३० वा.

● थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन २,३.