यूरो कप २०२० स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडनं डेन्मार्कचा २-१ ने पराभव केला. या विजयासह इंग्लंडनं यूरो चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत इंग्लंडचा सामना इटलीसोबत असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक गोल नोंदवला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात विजयी गोल मारण्यासाठी दोन्ही संघांची धडपड सुरु होती. मात्र ९० मिनिटांचा खेळ संपला तरी दोन्ही संघांना विजयी गोल मारता आला नाही. त्यामुळे सामन्याच्या निकालासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला. अतिरिक्त वेळेत इंग्लंडने २-१ ने आघाडी घेतली. हॅरी केननं अतिरिक्त वेळेतील १४ मिनिटाला म्हणजेच १०४ व्या मिनिटाला गोल झळकावला. मात्र डेन्मार्कच्या संघाला बरोबरी साधण्यात अपयश आलं.

दुसऱ्या सत्रातही बॉलवर इंग्लंडचं वर्चस्व होतं. दुसऱ्या सत्रात इंग्लंडच्या ताब्यात जास्तीत जास्त म्हणजेच ५७ टक्के बॉल होता. तर डेन्मार्कच्या ताब्यात ४३ टक्के बॉल होता. इंग्लंडनं पहिलं सत्र आणि दुसरं सत्र मिळून एकूण ५१२ वेळा बॉल एकमेकांकडे पास केला. पास अचूकता ही ८६ टक्के होती. तर डेन्मार्के ३९७ वेळा बॉल पास केला. यात पास अचूकता ८१ टक्के होती. या सत्रात इंग्लंड आणि डेन्मार्कच्या एका खेळाडूला मैदानात गैरवर्तन केल्याने पिवळं कार्ड दाखवण्यात आलं.

Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Match Updates in Marathi
KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या
IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 DC vs CSK: धोनीच्या सुसाट खेळीने बायको साक्षीही भारावली, सामना हरल्याचं गेली विसरून…
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी १-१ गोल करत बरोबरी साधली आहे. पहिल्या सत्रातील ३० व्या मिनिटाला डेन्मार्कनं १-० ने आघाडी घेतली होती. डेन्मार्कच्या मिकेल डॅम्सगार्डनं गोल झळकावत संघाला आघाडी मिळवून दिली. फ्री किक मिळाल्यानंतर डॅम्सगार्डनं त्या संधीचं सोनं केलं. २५ यार्डवरून त्याने गोल झळकावला. त्यामुळे इंग्लंडवर दडपण वाढलं होतं. त्यामुळे बरोबरी साधण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंची धडपड सुरु होती. डेन्मार्कचा आनंद फार काळ टिकला नाही. ९ मिनिटांनी म्हणजेच ३९ व्या मिनिटाला डेन्मार्कच्या सायमननं स्वगोल करत इंग्लंडचं दडपण दूर केलं.

पहिल्या सत्रात बॉलवर इंग्लंडचं वर्चस्व दिसून आलं. पहिल्या सत्रात जास्तीत जास्त वेळ म्हणजेत ६१ टक्के बॉल इंग्लंडच्या ताब्यात होता. तर ३९ टक्के बॉल हा डेन्मार्कच्या ताब्यात होता. इंग्लंडची पास अचूकता ही ८६ टक्के होती, तर डेन्मार्कची पास अचूकता ही ८१ टक्के होती. दोन्ही प्रत्येकी एक एक कॉर्नर मिळाला होता. या सामन्यासाठी मैदानात इंग्लंडनं ४-२-३-१ अशी, तर डेन्मार्कनं ३-४-३ अशी व्यूहरचना आखली आहे.

डेन्मार्कची या स्पर्धेतील सुरुवात खराब झाली, पहिल्या सामन्यात फिनलँडकडून १-० ने पराभव सहन करावा लागला. त्यानंतर बेल्जियमकडून २-१ ने हार पत्कारावी लागली. तर साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात रशियाचा ४-१ ने पराभव करत बाद फेरीत धडक मारली. बाद फेरीत डेन्मार्कने वेल्सचा ४-० ने धुव्वा उडवला. उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कने चेक रिपब्लिकला ४-० ने पराभूत केलं.

इंग्लंडने साखळी फेरीत क्रोएशिया आणि चेक रिपब्लिक संघाला पराभवाची धुळ चारली आहे. तर स्कॉटलँड विरुद्धचा सामना बरोबरीत सुटला होता. बाद फेरीत जर्मनीचा २-० ने पराभव करत इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडने युक्रेनचा ४-० ने धुव्वा उडवला.

दोन्ही संघांतील महत्त्वाचे मुद्दे

  • इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यात आतापर्यंत २१ सामने झाले असून इंग्लंडने १२ लढती जिंकल्या आहेत. डेन्मार्कने चार सामन्यांत विजय मिळवला असून उर्वरित पाच लढती बरोबरीत सुटल्या आहेत.
  • यूरो आणि फिफा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धामध्ये उभय संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. यापूर्वी १९९२ मध्ये बरोबरी, तर २००२ मध्ये झालेल्या लढतीत इंग्लंडने विजय मिळवला होता.
  • इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाने एकही गोल झळकावलेला नाही. त्याउलट डेन्मार्कने गेल्या तीन लढतींमध्ये सर्वाधिक १० गोल नोंदवले आहेत. त्यामुळे चाहत्यांना कडवी झुंज पाहायला मिळू शकते.